क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव गोंदिया. महिलांनी उच्चशिक्षित होऊन सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहचवावा- शितल पुंड
राजेन्द्र मेश्राम
गोंदिया शहर प्रतिनिधि
मो:9420513193
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा वारसा चालविण्या करिता जास्तीत जास्त महिलांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन, उच्च शिक्षण घेऊन, उच्च पदावर पोहोचून, सर्व सामान्य पर्यंत शिक्षणाची धारा पोहचविण्याच्या आटोकाट प्रयत्न करावा असे शितल पुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन भाषणातून मत व्यक्त केले
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोवर्स महिला संघटन, गोंदिया यांच्या तर्फे स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 192 वी जयंती हर्षो उल्हासात साजरी करण्यात आली. जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी विविध उपक्रम संघटनेमार्फत राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती शितल पुंड बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूरच्या एडवोकेट स्मिता कांबळे या होत्या. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी स्त्रियांची सावित्रीमाई फुले यांच्या काळची परिस्थिती व त्यांनी केलेली सुधारणा, तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये महिलांकरीता केलेल्या तरतुदी व आजच्या महिलांना करावयाच्या आवश्यक बाबी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून प्रमिला जाखलेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधून आपले जीवनमान उंचवावे व आपल्या मुलींना उच्च प्रतीचे शिक्षण द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांनी महिलांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. महिलांच्या शैक्षणिक बाबी, महिलांना एमपीएससी- यूपी एससी बद्दल जन जागृती या माध्यमातून हे कार्य करण्याकरिता सावित्रीमाई फुले संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण युवा आयकॉन मयुरा सावी, पत्रकार व को-फाऊंडर- व्यक्तिमत्व लर्निंग लॅब, मुंबई यांनी तरुण पिढीने सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचे आवाहन केले व स्वतःची प्रगती साधून सामाजिक प्रगती करिता हातभार लावावा असे मत व्यक्त केले. नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑर्गनायझेशन अँड सिकलसेल अलायन्स ऑफ सिकलसेल डिसीज ऑर्गनायझेशन चे बोर्ड मेंबर गौतम डोंगरे यांनी सिकलसेल विषयी सविस्तर माहिती दिली व सिकलसेल बद्दल उपस्थितांना जन जागृती पर उत्तम असे प्रबोधन केले. सिकलसेल तपासणी करून स्वतःची आणि स्वतःच्या येणाऱ्या पिढीच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी या ठिकाणी केले.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले संघटनाकडून जयंतीच्या वेळी सिकलसेल आजारा बाबत जनजागृती तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. याचवेळी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल सुद्धा लावण्यात आलेले होते. या प्रदर्शन व विक्रीमध्ये 12 बचत गटांनी सहभाग घेत आपले वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्टॉल धारकांची एकत्रित अंदाजे 70 हजार रुपयांची विक्री झालेली आहे. ही उल्लेखनीय बाब आहे.
कार्यक्रमाच्या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या सत्कारही करण्यात आला. यात प्रामुख्याने शितल जयेशचंद्र रामादे, मॅनेजिंग डायरेक्टर, सहयोग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, गोंदिया पंचफुला राणे, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, डव्वा व, गीता चोपराम भेंडारकर आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, डव्वा या तिघींनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच प्रार्थना मेश्राम, मुंबई संचालक- सोम्या ब्युटी क्लिनिक अँड स्पा यांनी आपल्या सौंदर्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघटनाकडून त्यांच्या सन्मान करण्यात आला.
सिकलसेल शिबिरात गोंदिया येथील होमिओपॅथी चिकित्सालयाचे डॉक्टर राजेश हत्तीमारे यांच्यातर्फे सिकलसेल या आजारावर मोफत मार्गदर्शन, उपचार व औषधी वितरण करण्यात आले. तसेच सल्लासुद्धा देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा तर्फे सिकलसेल तपासणी करिता वैद्यकीय चमू उपलब्ध करुन देण्यात आली होती. उपस्थितांनी मोठ्या संख्येत सिकलसेल ची स्वतःची तपासणी करून घेतली.
सायंकाळच्या सत्रांमध्ये कोल्हापूर येथून आलेले शाहीर सदाशिव निकम यांच्या परिवर्तनवादी व वैचारिक पोवाडाने जनतेला मंत्रमुग्ध केले व एक नवीन ऊर्जा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता ऊके तर संचालन ज्योती डोंगरे व वैशाली मेश्राम यांनी केले. तर आभार आम्रपाली वनकर- कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयिका यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता य वर्षीच्या समन्वयक आरती मानकर, अनिता मेश्राम, अलका बनसोड यांनी तसेच संघटनेच्या इतर सर्व महिला समता गणवीर, वैशाली खोब्रागडे, वाणी लांजेवार, निरंजना चिंचखेडे, उत्तमा गोंडाणे, स्मिता गणवीर, विना चव्हाण, रंजीता इंदूरकर, गीता गजभिये,ज्योत्स्ना मेश्राम, ज्योती फुले, सरिता कोशनकर , चंपाताई हुमणे, सरिता जवरे, किरण ऊके, एडवोकेट रेखा गजभिये, कुंदा गाडकीने, श्लेषा बडोले, अनिता ऊके, दर्शना वासनिक, कोकिळा राहुलकर, तक्षशिला गडपायले, वर्षा भोयर या सर्वांनी अथक प्रयत्न केले. जिल्हा परिषद आरोग्याच्या सिकलसेल तपासणी समितीतील सपना खंडाईत, निशा डहाके, डॉक्टर मीना वट्टी, शरणागत, सुरेंद्र पारधी, योगेश नाईकाने, यांचे मोलाचे सहकार्यातून कार्यक्रम शांततेने संपन्न करण्यात आला