आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांची पत्रकार परिषद; 7 जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या कडून भूमिपूजन व लोकार्पण सोहळा…
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत;-7 जानेवारीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कर्जत मधील ऐतिहासिक अशा लोकार्पण सोहळ्यासाठी भूमिपूजना साठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्ताने ऐतिहासिक सभेचे रूपांतर त्या निमित्ताने होणार आहे. आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी या मतदारसंघातील ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे त्यातील विशेषण कामांची माहिती दिली.
सर्वप्रथम कर्जाच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी नव्याने उभारलेल्या प्रवेशद्वार पाहतात त्या प्रवेशद्वाराला तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे नामकरण करण्यात आले आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्रति आळंदी प्रति पंढरपूर असे आपण 52 फूट विठ्ठलाच्या मूर्तीचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती याच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि पोलीस ग्राउंडच्या प्रशासकीय भवन या प्रशासकीय भवनाचे सुद्धा लोकार्पण सोहळा होणार आहे.
अशा पद्धतीने हे लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना भजन भूषण गजानन बुवा पाटील सभागृह या सभागृहासाठी 30 लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे व त्याचं भूमिपूजन केले जाणार आहे. तसेच कर्जत चौक रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. त्या साठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे . खोपोली येथील भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 84 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
खालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
माथेरान येथील एसटीपी प्लांट यांचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे अशा जवळजवळ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते असे
202 कोटी रुपयांचा विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानंतर आपण किरवली ते जुमापट्टीपर्यंतचा १२ किलोमीटरचा एकत्र जोडणारा रस्ता आहे या रस्त्याला 18 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्या ऐतिहासिक रस्त्याचे सुद्धा भूमिपूजन केले जाणार आहे.
चार वर्षांमध्ये या मतदार संघाचा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर एकत्र आल्यावर जाहीर पत्रकार परिषद घेतली आहे. दोन वर्ष साऱ्याची आपली दोन वर्षे करोना मध्ये गेली. त्यामुळे बरीचशी बंधने आपल्याला होती परंतु जो विकास करणे तो आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार या नात्याने आतापर्यंत करत आलो
ते आता खऱ्या अर्थाने आता आपल्या कर्जतकरांसाठी दिसत आहे. संपूर्ण मतदार संघामध्ये जीजी विकास कामे केली आहेत त्या विकास कामाचा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा येथे संपन्न होत असताना त्याला सांगायचं आहे हे जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहेत त्याने विकास कामे नसून हा पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संत परंपरेचा आपल्या विचारांचा वारसा हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे.
या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सांगितलं होत की मला ही मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचा मी सोने केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी एक स्वप्न पाहिलं होतं की या मतदारसंघाचा हा पूर्णपणे ट्रायबल भाग ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री येथे नाही तरीसुद्धा पर्यटनाला प्राधान्य देऊन रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कर्जत असेल खोपोली असेल माथेरान असेल अडीच वर्षांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागे पडलेला महाराष्ट्र हा यार सव्वा वर्षांमध्ये झपाट्याने पुढे आणून महाराष्ट्रात पुढे आणलाय. अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातला कर्जत मतदारसंघ हा सुद्धा भविष्यामध्ये एक नंबरला विकासाच्या मार्गामध्ये उभा राहिला पाहिजे. त्या ठिकाणी विकास करतात खोपोली कर्जत माथेरान ही खऱ्या अर्थाने एक सिम्बॉलिक शहर म्हणून ओळखले जावेत त्या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघाचा विकास केलेला आहे म्हणून एक स्लोगन तयार केला आहे ते जाहीरपणे सांगतो चला घडवू नंदनवन कर्जत खालापूर नंबर वन
माथेरान येथील रोपवे केव्हा चालू होणार या संदर्भात आपले काय म्हणणे आहे? यावर आमदार थोरवे असे म्हणाले
एका प्रायव्हेट टाटा कंपनीने त्याच्यावर पूर्णपणे वर्किंग केलं होतं त्याने सर्व एनओ.सी. घेतल्या होत्या या हिवाळी अधिवेशला नागपूर मध्ये आग्रही होऊन हा प्रश्न घेतला होता. टाटा कंपनीला सुद्धा आम्ही सांगितले आहे तो प्रोजेक्ट हॅन्ड वर करून द्या आणि मंत्र्यांची सुद्धा चर्चा केलेली आहे की तो प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर तो प्रोजेक्ट लवकरात लवकर आपण सुरू करू व ते काम सुद्धा एक ऐतिहासिक कर्जतकरां साठी होईल.
7 तारखेला सर्वच कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे म्हणून सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आमदार थोरवे यांनी केले आहे.