गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्या वतीने को.ए.सो. लोकनेते ॲड.दत्ता पाटील हायस्कूल, बेलोशी येथील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणास प्रारंभ…
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने को.ए.सो. लोकनेते ॲड.दत्ता पाटील हायस्कूल, बेलोशी येथील मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता – मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितिन सक्सेना – महाप्रबंधक, शितल लाकरा – मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संतोष प्रभाकर बोंद्रे – मुख्याध्यापक, को.ए.सो. लोकनेते ॲड.दत्ता पाटील हायस्कूल, बेलोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, सहाय्यक शिक्षक रवींद्र गंगाराम शिंदे, मुकेश शांताराम कोळी, सचिन काशिनाथ कांबळे, काशिनाथ मधुकर मुंबईकर, श्रीनिवास रामदास साळसकर, नितीन सुभाष गावित, सहाय्यक शिक्षिका कल्पना मुकेश कोळी, दिपाली मिलिंद शेळके, नीता अनिल म्हात्रे, कनिष्ठ लेखनिक श्रेया संदीप चेरकर प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, मनीषा माने, दिव्या शिंदे, निकी बेंडे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संतोष बोंद्रे सरांनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगितले प्रत्येक वेळी हाताला राखी बांधणारा भाऊ आपल्या मदतीसाठी येईलच असे नाही त्याकरिता आपण नेहमी सक्षम असणे गरजेचे आहे गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल तसेच त्यांनी तपस्वी गोंधळी यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थिनींना देत प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणास बेलोशी हायस्कूल मधील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.