लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, चोंढी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी…..
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग; एल.एस.पी.एम. महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण विभाग अंतर्गत तक्रार निवारण कमिटी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती आणि वाचन संकल्प पंधरावडा साजरा करण्यात आला.
3 जानेवारी रोजी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण विभाग अंतर्गत तक्रार निवारण कमिटी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला सक्षमीकरण कार्यक्रम महाविद्यालयात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी व्याख्यात्या व प्रशिक्षिका लाभल्या होत्या. लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर उर्फ काका ठाकूर, मोहिनी रानडे- केंद्र प्रशासक, वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला व बालविकास विभाग, रायगड, स्वाती म्हात्रे- समुपदेशक वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला व बालविकास विभाग, रायगड यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्राचार्य लीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. मोहिनी रानडे केंद्र प्रशासक वन स्टॉप सेंटर जिल्हा महिला बाल विकास विभाग, रायगड यांनी महिला बाल विकास विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तर विद्यार्थिनींनी कोणावरही अवलंबून न राहता सक्षम व्हावे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवावी. शिक्षणापासून वंचित राहू नये असे मार्गदर्शन तपस्वी गोंधळी यांनी विद्यार्थिनींना केले सदर मार्गदर्शना नंतर विद्यार्थिनींना स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राध्यापिका हर्षदा पूनकर व प्राध्यापिका राजश्री कदम यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापिका दर्शना तोडणकर आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका हर्षदा पूनकर यांनी केले.