बजरंग दल तसेच लोनवाही वासीयानी सिंदेवाही शहरात होणाऱ्या बेकायदेशीर ख्रिश्चन मिशन्नरी चर्चचे बांधकाम थांबविले

बजरंग दल तसेच लोनवाही वासीयानी सिंदेवाही शहरात होणाऱ्या बेकायदेशीर ख्रिश्चन मिशन्नरी चर्चचे बांधकाम थांबविले

बजरंग दल तसेच लोनवाही वासीयानी सिंदेवाही शहरात होणाऱ्या बेकायदेशीर ख्रिश्चन मिशन्नरी चर्चचे बांधकाम थांबविले

बजरंग दल तसेच लोनवाही वासीयानी सिंदेवाही शहरात होणाऱ्या बेकायदेशीर ख्रिश्चन मिशन्नरी चर्चचे बांधकाम थांबविले
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो 8806689909

सिंदेवाही :- सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत येथील वार्ड क्र. 2 मध्ये असलेल्या हनुमान मंदिर चौकातील भर वस्तीमध्ये एका तामिळ्नालू मध्ये राहणाऱ्या व्यक्तीने प्लॉट घेऊन थेट त्या प्लॉट मध्ये खिश्चन चर्च बनवण्याचे काम सुरु केले . काम सुरु करीत असताना कोणत्याही प्रकारचे परवानगी नगरपंचायत व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांकडून घेतलेली नाही. नगरपंचायत क्षेत्रात चर्चचे बांधकाम करीत असताना येथील नगरसेवक किंवा नगराध्यक्ष्य यांना माहीती देण्यात आली नाही. सरळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि इंजिनीयर यांनी मिटिंग हाल बांधकाम करण्याकरिता मंजुरी दिली असल्याचे सांगितले . त्यामुळे सिंदेवाही शहरातील भोळ्याभाबडया जनतेला गेल्या कित्येक दिवसांपासून भूतबाधा दूर होते, मुलं होतात, लग्न होते, तुमचे आजार बरे होतात अशा भुलथापा देऊन फसवण्याचा आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरीत करण्याचे षडयंत्र सुरु आहे, त्यांना पैश्याचे आमिष दाखविल्या जात आहे हे सगळ्या गोष्टीना आळा घालण्याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा सिंदेवाही यांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे निवेदन दिले आहे.
जर प्रशासनाने योग्य कार्यवाही केली नाही तर लोकांद्वारे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
तरी आपण सर्वांनी सतर्क राहावे, धर्मांतरीत होण्यापासून जनतेला रोकावे, त्यांचं मिशन हे संपूर्ण सिंदेवाहीला ख्रिश्चनमय करण्याचे आहे, यांना काही नेत्याचे राजकीय आश्रय सुद्धा आहे असं लोकांकडून ऐकण्यात आले आहे आपल्या परिवारात असणाऱ्या मुलामुलींना रोकावे ही नम्र विनंती सिंदेवाही नगरवाशीय जनतेला विश्व् हिंदू परिषद, बजरंग दल शाखा सिंदेवाही यांच्या वतीने केली असून वसाहतीमध्ये बांधकामाला सुरवात करीत असताना येथील राहणाऱ्या लोकांनी तसेच बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी काम बंद केले.काम बंद करताना कुणाल पेशंट्टीवार (तालुकासंयोजक विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंदेवाही )
राहुलजी अलमस्त (प्रांतपरियोजना प्रमुख धर्मजागरण विभाग विदर्भ प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
राहुल कावळे (जिल्हा संयोजक भाजयुमो सोशल मीडिया चंद्रपूर ) रोशन करकाडे, राहुल करकाडे, शुभम ठाकरे, स्वप्निल मेश्राम, रितेश मारशेट्टीवर, मंगेश ठाकरे, फाल्गुन लोखंडे व बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि लोणवाही नगरीतील लोक उपस्थितीत होते.