अमरावतीत 12 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार.

61

अमरावतीत 12 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार.

Dera raped 35-year-old widow Bhavjayi. In Jalgaon, the relationship was shattered.

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील 12 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात एका 34 वर्षीय नराधमाने हे कृत्य केलं आहे.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच तासाभरातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तर आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. सदर मुलगी व आरोपी एका गावातील असून तिला गावाजवळील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. विठ्ठल कामठे असं आरोपीचं नाव आहे. सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली आहे, तर पीडित मुलगी ही 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

तिवसा पोलिसांत आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलम 376,(3),सह कलम 4,6,पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातील संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.