वर्धा जिल्हात होणार होता 12 वर्षीय मुलीचा बालविवाह.
बाल संरक्षण कक्षाचा सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश.
प्रशांत जगताप
वर्धा:- जिल्हातील वायगाव येथे होऊ घातलेला 12 वर्षीय मुलीचा बालविवाह पोलिस व वर्धा जिल्हा बालसंरक्षण समिती यांच्या सतर्कतेमुळे वायफड परिसरात होत असलेला बालविवाह थांबविण्यात यश आले. याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माघील अनेक दिवसांपासून जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडुन संपुर्ण वर्धा जिल्हात बाल संरक्षण समिती बालविवाह रोखण्याकसाठी जनजागृतीचा कार्यक्रम राबवित आहे. या मोहीमे अंतर्गत वायफर गावात जनजागृती कार्यक्रमादरम्यान गावात एका 12 वर्षाचा अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा बालसंरक्षण टीम वर्धा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष कर्मचारी माधुरी भोयर यांनी सदर माहिती पुलगाव पोलिस स्टेशनमध्ये कळविली असता, पुलगाव पोलिस स्थानकातील निरिक्षक गायकवाड व पोलिस तापा, सरपंच विजय राऊत, ग्रामसेवक राजेंद्र सोरते, पर्यवेक्षीका ममता रामटेके अंगणवाडी सेविका वैशाली मिस्किन, सुनंदा हिरुरकर, मेघा तमगीरे, आरती नरांजे, अमर कमले, अक्षय महळगवे सदर मुलीच्या घरी जाऊन कुटुंब प्रमुखांकडून असे कृत्य न करण्याची लेखी हमी घेतली.
बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणी पोलिस यांना अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाबद्दल प्रथम सदर विवाह होत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांचे व नियोजित वधूच्या पालकांचे समुपदेशन केले व बालविवाह कायद्याने गुन्हा आहे, हे त्यांना समजावून सांगितले. बालविवाह केल्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 प्रमाणे आपणास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, त्याचप्रमाणे पन्नास हजारांपर्यंत दंड होऊ शकतो, या कायदेशीरबाबी त्यांना समजावून सांगितल्या. या प्रकरणी वर्धा बालकल्याण समिती यांनीही हस्तक्षेप करून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर वधूच्या पालकांकडून मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. वर्धा जिल्ह्यामध्ये कोठेही बालविवाह होत असेल तर चाइल्ड लाइन व बालकल्याण समिती वर्धा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यांनी केले आहे.