केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनाची आठवणणीचे निवेदन
प्रशांत जगताप प्रतिनिधी
वर्धा:- आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन त्यांनी दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनाची आठवण वर्धा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करुन देण्यात आली.
आपण भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना विदर्भवाद्यांना स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते जर केंद्रात भाजपचे सरकार निवडणून आल्यास आम्ही 100 दिवसात स्वतंत्र विदर्भ करू पण त्या आश्वासना ला 7 वर्ष पूर्ण होत आहे त्या आधी भुवनेश्वर च्या सभेत स्वतंत्र विदर्भाचा ठराव पास करून भाजपा ने स्वतंत्र विदर्भाच्या नावाने विदर्भातील जनतेची फसवणूक करून सत्तेवर बसले प्रत्येकवेळी विदर्भातील जनतेला दिलेलं आश्वासन न पाळून विदर्भातील जनतेचा विश्वास घात केला. आता भारतीय जनता पक्षाचे केंद्रात स्वबळावर मजबूत सरकार असून विदर्भाचे स्वतंत्र राज्य करायला काहीही अडचण आपल्या पुढे नाही अशी आमची धारणा असून विदर्भातील वजनदार नेते व केंद्र सरकारमधील वजनदार नेते म्हणून आपण आता विदर्भातील जनतेचे स्वतंत्र विदर्भ राज्याचे स्वप्न पूर्ण करण्यास केंद्र सरकारला बाध्य करावे ही आम्हा विदर्भातील जनतेची व युवा अघाडी आंदोलन समितीची मागणी आहे या मागणी कडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आम्हाला स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन तीव्र करावे लागनार विदर्भ राज्य आंदोलन समिती अँड वामराव चटप आंदोलन नेते, सचिन डाफे युवा आघाडी वर्धा जिल्हा प्रमुख, राम नेवले मुख्य संयोजक, मुकेश ठाकूर विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी तालुका प्रमुख वर्धा. दत्ताजी राऊत, प्रसाद कोडगिरवार जनक्रांती सेना उपाध्यक्ष, महादेव गोहो, धोंडबाजी गावंडे