शेतकऱ्यांच आज चक्का जाम आंदोलन.

दिल्ली:- च्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज चक्का जाम आहे. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत 50,000 दिल्ली पोलीस, पॅरामिलिटरी आणि राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.शहरातील 12 मेट्रो स्टेशन्स हाय अलर्टवर आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि तारांची बंडलं सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेत अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीत हिंसाचार झाला. आयटीओ या ठिकाणी ट्रॅक्टर उलटून एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून केसरिया झेंडा रोवला. त्यादिवशी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. 83 पोलीस हिंसाचारात जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.