सायन गुरुकृपा हॉटेलचे मालक कींग ऑफ समोसा दानवीर गगला सेठ वाधवा ह्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.
कोरोना वायरस महामारी लॉकडाऊनच्या काळात अनेक गरिब परिवाराला गगला सेठ वाधवा यांनी दोन्ही हाताने मदत केली होती.
मुंबई :- येथील सायन परीसरातील प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेलचे मालक कींग ऑफ समोसा म्हणून प्रसिध्द असलेले, गोर गरीबांना नेहमी मदत करणारे, कोरोना महामारीच्या काळात अनेक गरिब परिवाराला अन्न धान्य आणी आर्थिक मदत करणारे दानवीर व्यक्तीमत्वाचे धनी गगला सेठ वाधवा ह्यांचे 03 फेब्रुवारी बुधवारला हृदय विकाराच्या झटक्याने रात्री निधन झाले सगळ्यांच्या मदतीला धावणारा आणी आपल्या हॉटेलचे च्या समोर आलेल्या सर्व गोरगरीबांना खाली हात न पाठवता त्यांना पोटभर जेवण खाऊ घालणारा गरीबांचा अन्न दाता खर्या अर्थाने माणसातला देवमाणूस आज अनंतात विलीन झाला जणू मायेचा आधारच हरपला. अशी प्रतिक्रिया अनेक लोकांनी व्यक्त केली.