पालघर नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळले.

49

पालघर नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळले.

नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण करुन त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. या नौदल अधिकाऱ्याचे चेन्नईतून अपहरण करण्यात आले होते. त्याला पालघरमधील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. 

 Palghar abducted a senior naval officer and burnt him alive.
दयानंद सावंत

पालघर :- पालघर जिल्ह्यात जमावाने साधुंची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नौदल अधिकाऱ्याचं अपहरण करुन त्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नौदल अधिकाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले, या नौदल अधिकाऱ्याचे नाव सुरज कुमार दुबे 27 वर्षे असे असल्याची माहिती समोर आली आहे. हा अधिकारी झारखंडचा निवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सुरज कुमार दुबे यांचं चेन्नई विमानतळाजवळून अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी तीन दिवसांपर्यंत सुरज कुमार दुबे यांना अज्ञातस्थळी ठेवलं होतं. आरोपींनी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून 10 लाखांची खंडनी मागितली. मात्र पैसे न मिळाल्याने आरोपींनी सुरज कुमार दुबे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळले.