तंत्र-मंत्रांच्या आहारी गेलेल्या सूनेने साधनेसाठी अपंग सासर्याची गळा चिरून केली हत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील आहे. अकराबाद गौहाली या गावात राहणाऱ्या एका सूनेनं आपल्या वयस्कर सासऱ्याची हत्या केली आहे. यावेळी वयस्कर भगवान दास घरासमोरील छप्परात झोपले होते. यावेळी कर्म कांडाच्या विळख्यात सापडलेल्या सूनेनं साधनेसाठी आपल्या अपंग सासऱ्याची गळा चिरून हत्या केली आहे. यावेळी घरातील सर्व सदस्य शेजारील दुसऱ्या गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या घटनेची सकाळी माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांना घटनास्थळी पूजा-आर्चा करण्याचं सामान मिळाल्यानं बळी दिल्याचा संशय आला.
पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या सूनेची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी सूनेने धक्कादायक खुलासा केला. मृत भगवान दासच्या सूनेने पोलिसांना सांगितलं की, ‘तिच्या अंगात देवी येते. ती नेहमी तंत्र-मंत्राच्या कार्यात विलीन असते. देवीच्या आदेशानंतर ती कोणतंही काम पूर्ण करू शकते. पण गेल्या तीन वर्षांपासून तिच्या सासऱ्याला अर्धांगवायू झाल्याने तिच्या तंत्र – मंत्राच्या कार्यात अडथळे निर्माण होतं होते, असं सांगितलं जात आहे. बराच वेळ सासऱ्याची सेवा करण्यात वेळ जात असल्याने तिला कर्मकांडासाठी वेळ मिळत नसल्याचा खुलासा सूनेने केला.
याच कारणामुळे आरोपी सून आपल्या अपंग सासऱ्यावर नाराज होती. अशातच गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य शेजारील गावात एका आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यामुळे सासऱ्याची हत्या करण्याती आयती संधी सूनेला मिळाली. या संधीचा फायदा घेऊन आरोपी सूनेने सासऱ्याचा गिळा चिरून हत्या केली आहे. पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आरोपी सूनेला ताब्यात घेण्यात आलं असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर तिला न्यायालयासमोर हजर करून तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.