भंडारा जिल्हातील अड्याळ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मृत्यूने माजली एकच खळबळ.
भंडारा जिल्हातील अड्याळ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मृत्यूने माजली एकच खळबळ.

भंडारा जिल्हातील अड्याळ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मृत्यूने माजली एकच खळबळ.

भंडारा जिल्हातील अड्याळ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मृत्यूने माजली एकच खळबळ.

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी, जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:- भंडारा वनविभागातिल पवनी तालुकामधील अडयाळ वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणारे सहवनक्षेत्र अडयाळ मधील नियतक्षेत्र कैसलवाडा येथील मौजा पिंपळगांव (निपानी) गट क्रमांक ७४० झु.ज. येथे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान एक मादी बिबट हा वन्यप्राणी मृतअवस्थेत आढळून आली. सदर घटनास्थळाचा आजुबाजुच्या परिसराची वनकर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता दोन कोल्हे, एक रानमांजर व तिन गावठी कुत्रे मृत असल्याचे निर्देशनास आले. सदर सर्व मृत वन्यप्राण्यांचे मृत्युचे कारण स्पष्ट होण्याकरीता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमु मार्फत शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर मृत वन्यप्राण्यांच्या शरीराचे दहन करण्यात आले, सदर वन्य प्राण्यांच्या हत्येचा गुन्हाचा तपास कुलराज सिंग, उपवनसंरक्षक भंडारा वनविभाग भंडारा यांच्या मार्गदर्शनात वाय. बी. नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) भंडारा व श्री घनश्याम ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ हे करीत आहेत.

या प्रकरणाचा तपास करण्याकरीता घटनास्थळावर नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील स्वान पथकाला पाचारण करून परिसराची तपासणी करण्यात आली. सदर कार्यवाहीदरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या चमुमध्ये डॉ. सचिन भोयर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुचिकीत्सालय पवनी, डॉ. गुणवंत भड़के पशुधन विकास अधिकारी लाखनी, डॉ. विठ्ठल हटवार पशुधन विकास अधिकारी मानेगांव, डॉ. व्हि. बि. चव्हान पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती पवनी, डॉ. एन. एस. सोनकुसरे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती लाखांदुर हे उपस्थित होते. NTCA चे प्रतिनिधी म्हणुन श्री. शाहीद खान तसेच वनविभागाचे श्री संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक भंडारा, श्री. विवेक राजुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, श्री. रुपेश गावीत वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदुर, अडयाळ वनपरिक्षेत्राचे सर्व वनपाल, वनरक्षक व नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे श्वान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हान पशुवैद्यकीय अधिकारी पवनी यांनी सदर मृत्यु हे विषबाधने झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here