रोजगार हमी योजनेच्या कामगारांना तिथे..भरवला जातो रोज सायंकाळ ला जेवनाचा घास १०० ते १५० कामगार कामावर कार्यरत

58

रोजगार हमी योजनेच्या कामगारांना तिथे..भरवला जातो रोज सायंकाळ ला जेवनाचा घास

१०० ते १५० कामगार कामावर कार्यरत

रोजगार हमी योजनेच्या कामगारांना तिथे..भरवला जातो रोज सायंकाळ ला जेवनाचा घास १०० ते १५० कामगार कामावर कार्यरत

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजने अंतर्गत कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला असता
गोंडपिपरी तालुक्यातील ग्राम पंचायत धानापुर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत मातीच्या कामाला सुरुवात झाली,त्यामुळे येथील गरीब आणि होतकरू लोकांना रोजगार उपलब्ध झाला.’महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन’
ग्रामीण भागातील अकुशल व्यक्तींना रोजगार मिळावा यामागचा उद्देश आहे.या योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०९ दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते आणि १००दिवसावरील प्रति कुटुंब प्रत्येक मजुराच्या,मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.नर्सरी-रोपवाटिका तयार करणे,स्मशानभूमी सुशोभीकरण, वृक्ष लागवड,शौचालये बांधणे, गाळ काढणे,नाला खोलीकरण, सिमेंट नाला बंडिंग,विंधन विहीर करणे,शेततळे,नाल्यांतील गाळ काढणे आदी कामांचा रोजगार हमी योजनेत समावेश होतो.
असाच उपक्रम तालुक्यातील धानापुर या गावात राबवल्या जात आहे.जवळपास १०० ते १५० कामगार कामावर कार्यरत आहेत.सदर उपक्रम शासकीय असल्याने ग्राम पंचायती कडून कामगारांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.त्याच प्रमाणे जिल्हा परिषद च्या सहाय्यतेने ग्राम पंचायत मार्फत कामगारांना रोज सायंकाळ ला गावात जेवण पुरविला जातो त्यात भात,वरण, मोठ चे उसळ,मिरचीचा ठेचा आणि जेवण अखेर गुळ दिला जातो.कामगारांच्या प्रती शासन आणि ग्राम पंचायत चे पदाधिकारी सजग असल्याचे पाहून गावातील रोजगार हमी योजने च्या कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.खास करून या स्तुत्य उपक्रमाला येथील सामाजिक युवा कार्यकर्या विपीन मोरे यांचे मोलाचे सहकार्य आहे.