सेवानिवृत्त प्राचार्याची दीड लाखाने फसवणूक. ब्रम्हपुरी येथील घटना — ऑनलाइन प्रणालीने झाली फसवणूक.

55

सेवानिवृत्त प्राचार्याची दीड लाखाने फसवणूक.

ब्रम्हपुरी येथील घटना — ऑनलाइन प्रणालीने झाली फसवणूक.

सेवानिवृत्त प्राचार्याची दीड लाखाने फसवणूक. ब्रम्हपुरी येथील घटना -- ऑनलाइन प्रणालीने झाली फसवणूक.

///राहुल भोयर///
प्रतिनीधी ब्रम्हपुरी 9421815114///

ब्रह्मपुरी :- येथील सेवानिवृत्त प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे यांची १५५ हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली या प्रकाराची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे करण्यात आली. अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सेवानिवृत्त प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे हे गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ब्रह्मपुरी येथील विद्यानगर येथे वास्तव्याने राहतात. दिनांक ४ फेब्रुवारीला एका अज्ञात व्यक्तीचा ठेंगरे यांच्या मोबाईलवर फोन आला. तुमच्या स्टेट बँकेच्या खात्याला आधार कार्ड व पॅन कार्ड लींक नसल्याने तुम्हाला पाठवलेल्या लिंक वर जाऊन तुमचा फॉर्म भरून घ्या व मोबाईलवर आलेली ओ टी पी सांगा अशा प्रकारचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेंगरे यांनी आलेल्या लिंकवर जाऊन फार्म भरले व आलेली ओटीपी त्या व्यक्तीला सांगितले . ठेंगरी यांना शंका आल्याने आपल्या जवळील लॅपटॉपवरून सदर बँकेचा तपशील बघितले असता तीनदा आपल्या खात्यातून एकून चक्क १ लाख ५५ हजार काढल्याचे निदर्शनास आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शरदचंद्र ठेंगरे यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ५६/२०२२ नुसार भांदवी कलम ४२० तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव करीत आहेत.