वणी: परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यात नायलॉन मांजाने गळा कापला.
वणी: परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यात नायलॉन मांजाने गळा कापला.

वणी: परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यात नायलॉन मांजाने गळा कापला.

यवतमाळ जिल्हातील वणी येथील घटना.
नायलॉन मांजाच्या बंदीची प्रशासनाची उडावली जात आहे खिल्ली.

वणी: परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यात नायलॉन मांजाने गळा कापला.
वणी: परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यात नायलॉन मांजाने गळा कापला.

✒यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ/वणी:- यवतमाळ जिल्हातील वणी येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वणी शहरातील. जैन लेआऊट येथील विद्यार्थिनी सराव परीक्षा देण्यासाठी गाडीने रस्त्यावरुन जात असताना सकाळी आठच्या सुमारात तनुश्री विलास पारखी हिचा नायलॉन मांजाने गळा कापला त्यामूळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

जखमी तनुश्री विलास पारखी या आपल्या अॅक्टिव्हा गाडीने आपल्या एका मैत्रिणी बरोबर शाळेत सराव परीक्षा देण्यासाठी जात होती. आवारी लेआऊटमधील मनोहर मुके यांच्या घराजवळ डांबर रोड वर अचानक पतंगीचा नायलॉन मांजा विद्यार्थिनीच्या गळ्यात लटकला. नायलॉन मांजा असल्यानं तिचा गळा कापला गेला. यात जखमी झालेल्या तनुश्री विलास पारखी यांना तातडीने वणीच्या सुगम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तनुश्रीच्या गळ्याला दहा टाके मारण्यात आले. यावरून पतंगीचा नायलॉन मांजा किती धारधार होता हे जखमेवरुन लक्षात येते.

नायलॉन मांजाची सर्रास विक्री

नायलॉन मांजा संपूर्ण राज्यात छुप्या पद्धतीन सर्रास विकला जात आहे. त्याचेच हे एक उदाहरण म्हणायला हरकत नाही. या नायलॉन मांज्याने दर वर्षी अनेक अपघात होतात. यात काहीना जीव गमवावा लागला आहे तर काहींचे जीव वाचले आहेत. प्रशासनाने बंदी घालूनही नायलॉन मांजा विकला जात आहे. आता गरज आहे ती नागरिकांनी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here