अज्ञात चोरटाने फोडले एका मागोमाग एक असे दोन मेडिकल दुकान अपुऱ्या पोलीस कर्मचारी असल्याने पोलासाची धावपळ सुरु 

59
दोन मेडिकल दुकान अज्ञात चोरटाने फोडले; अपुरे पोलीस कर्मचारी कुठे कुठे धावणार?

 

अज्ञात चोरटाने फोडले एका मागोमाग एक असे दोन मेडिकल दुकान

अपुऱ्या पोलीस कर्मचारी असल्याने पोलासाची धावपळ सुरु 

दोन मेडिकल दुकान अज्ञात चोरटाने फोडले; अपुरे पोलीस कर्मचारी कुठे कुठे धावणार?

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ :- दिनांक ६ फेब्रुवारी नेरळ पोलीस स्टेशन लगत एस.बी.आय. बँकेच्या एटीएम बाजूला अर्णव मेडिकल आहे ज्याला सेंटर लॉक देखील आहे ते अज्ञात चोरट्याने शटर वाकवून फोडले आहे तसेच निर्माण नगरी येथील डॉक्टर देशमुख यांच्या खालील शिशु केअर मेडिकल याचे शटर वाकवून चोरी झाल्याचे सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे … मेडिकलच्या शटरला लोखंडी पट्टी मारून देखील शटर वाकून चोरी केली जाते म्हणजेच चीरांकडे अत्याधुनिक यंत्र आलेत की काय? असा सवाल नागरिकांकडून होत आहे. चोर सीसीटीव्ही मध्ये दिसत असून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले आहेत करणा त्या वेळेस पोलीस गस्त चालू होती. ही घटना पहाटे साधारण पाच ते साडेपाच या दरम्यान केल्याचे सी सी टीव्ही मध्ये दिसत आहे. माऊली मेडिकल येथे देखील चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु बाजूला असलेल्या एटीएम सिक्युरिटी गार्ड यांनी गोंगाट घातल्यामुळे ते तिथून पळ काढण्यास यशस्वी झाले आहेत. एकंदरीत पाहता दुकानाला सेंटर लॉक असून द्या किंवा खालच्या बाजूला पट्टी लावू असू द्या चोरी करणारे चोर हे चोरी करून जात आहेत व पोलीस प्रशासनाला तुरी देऊन चोर चोरी करीतच आहेत. सुत्रांद्वारे माहिती मिळत आहे कि नेरळ ठाणे येथील प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी धवळे हे कार्यभार स्वीकारल्यापासून अद्याप सुट्टीवर गेले नाहीत. अपुरे पोलीस कर्मचारी व झपाट्याने वाढणारे नागरीकरण या मुळे पुरेसे पोलीस नसल्या मुळे हा प्रकार होत आहे पण रात्रीची गस्त असताना देखील चोर कसे धाडस करीत आहेत त्यांना कसलीच भीती राहिली नाही का? नेमके काय कारण असावे हे मात्र चोर ताब्यात आल्यावर समोर येईल. अपुरे स्टाफ जरी असेल तरी चोराला नेरळ पोलीस जेरबंद करतील असा विश्वास जातेमध्ये आहे हे तितकेच खरे.