राष्ट्रसंताचा विचार समाजात पोहोचविण्याचा संकल्प करा वक्तृत्व स्पर्धा, कार्यकर्ता मेळावा व राष्ट्रीय किर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे आवाहन

71
राष्ट्रसंताचा विचार समाजात पोहोचविण्याचा संकल्प करा वक्तृत्व स्पर्धा, कार्यकर्ता मेळावा व राष्ट्रीय किर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे आवाहन

राष्ट्रसंताचा विचार समाजात पोहोचविण्याचा संकल्प करा

वक्तृत्व स्पर्धा, कार्यकर्ता मेळावा व राष्ट्रीय किर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे आवाहन

राष्ट्रसंताचा विचार समाजात पोहोचविण्याचा संकल्प करा वक्तृत्व स्पर्धा, कार्यकर्ता मेळावा व राष्ट्रीय किर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवराव भोंगळे यांचे आवाहन

🖋️ साहिल सैय्यद….

तालुका प्रतिनिधि घुग्घुस :
📲 9307948197

घुग्घुस :आदर्श समाजाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुधारणावादी विचाराला समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प करा असे आवाहन राजुरा विधानसभेचे निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.

येथील बहुउद्देशीय वारकरी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यस्मरण तथा सर्व संत स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धा, गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता मेळावा व राष्ट्रीय किर्तनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी स्थानिक प्रयास सभागृहात संपन्न झाला.

उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रमुख पाहुणे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सर्वाधिकारी अभा श्रीगुरुदेव सेवाश्रम लक्ष्मण गमे, जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे, हभप निळकंठ हळदे, ग्रामगिताचार्य प्रेमलाल पारधी, विनोद चौधरी, साजन गोहने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रथम सत्रात घटस्थापना व सामुदायिक ध्यानपाठ, पतंजली योगसमितीच्या वतीने योगासन, शालेय मुलांना मार्गदर्शन तथा वक्तृत्व स्पर्धा, गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता मेळावा, राष्ट्रीय किर्तन आयोजित करण्यात आले.

रविवारी प्रथम सत्रात ग्रंथदिंडी, पालखी, शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. भजन संमेलन व रात्री तृतीय सत्रात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटक ” क्रांतिनायक ” चे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिवरकर, सचिव सुरेश ढवस, कोषाध्यक्ष चंद्रशेखर बोबडे, संघटक जयंत जोगी व बहुउद्देशीय वारकरी श्रीगुरुदेव सेवा मंडळ घुग्घुसच्या सर्व सदस्य गणांनी प्रयत्न केले.

यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.