उत्कृष्ट महिला मंचतर्फे हळदी कुंकू तथा सावित्रीच्या लेकी स्पर्धा कार्यक्रम संपन्न

62

उत्कृष्ट महिला मंचतर्फे हळदी कुंकू तथा सावित्रीच्या लेकी स्पर्धा कार्यक्रम संपन्न

उत्कृष्ट महिला मंचतर्फे हळदी कुंकू तथा सावित्रीच्या लेकी स्पर्धा कार्यक्रम संपन्न

 

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 6 फेब्रुवारी
उत्कृष्ट महिला मंचतर्फे श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे हळदी कुंकू तथा सावित्रीच्या लेकी स्पर्धा घेण्यात आली. 2 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गोमती पाचभाई, अतिथी- डॉक्टर अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, दुर्गा पोटूडे, अस्मिता काच्छल, स्मिता रेबनकर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष सहकार्य करण कोठारी ज्वेलर्स यांचे लाभले. सावित्रीच्या लेकी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक धनश्री मुसने, मुख्याध्यापिका प्रज्ञा गंधेवार यांची उपस्थिती होती. हळदी कुंकू या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यात प्रथम सरिता घटे, द्वितीय प्रियंका येरर्णे तृतीय कविता झाडे यांना गिफ्ट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सावित्रीच्या लेकी या विषयाला अनुसरून वेशभूषा करुन दोन मिनिटं सावित्रीच्या लेकीवर मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक रुपाली पिंपळशेंडे, द्वितीय मेघा रणवीर, तृतीय कल्पना बडी यांनी पटकाविला. संचालन शिक्षिका वैशाली कन्नमवार यांनी तर प्रास्ताविक सारिका भुते यांनी केले. आभार अर्चना चहारे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व सदस्य साक्षी कार्लेकर, मनीषा कन्नमवार, प्राध्यापक स्नेहल बागडे, पूजा पडोळे,प्रणिता जुमडे, सारिका बोराडे, आयुषी भुते, जयश्री साखरकर, रुपाली चिताडे, मंगला मोगरे, नीलिमा रघाताटे, स्नेहा काळे, अभिलाषा मेंडुलकर, चंदा घोरमारे, ज्योती लक्कावार, सोनाली गुंडे, वैशाली कांबळे, रोशनी गुंडे, वैशाली साखरकर, अर्चना येरणे, मनीषा जोशी, संगीता बोरीकर, सुचिता मोरे, प्रीती आगडे, चेतना मेहर, मंजुषा ढवस, शालू कंदोजवार, वैशाली पडशालवार, स्नेहल चहारे, वर्षा मोहरले, मीनल नवघरे, सोनिया दुधे,अंकिता चौरे, शारदा मुरस्कर, योगिता धनेवार, सुलचना गायकवाड, सोनाली आंबेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व महिला सदस्यांची उपस्थिती होती.