धोत्रेवाडी मध्ये ८१ थेंबभर पाणी नाही… ग्रामस्थांची चौकशीची मागणी आणि उपोषणाचा इशारा नेरळ,ता.

59
धोत्रेवाडी मध्ये ८१ थेंबभर पाणी नाही... ग्रामस्थांची चौकशीची मागणी आणि उपोषणाचा इशारा नेरळ,ता.

धोत्रेवाडी मध्ये ८१ थेंबभर पाणी नाही… ग्रामस्थांची चौकशीची मागणी आणि उपोषणाचा इशारा
नेरळ,ता.

धोत्रेवाडी मध्ये ८१ थेंबभर पाणी नाही... ग्रामस्थांची चौकशीची मागणी आणि उपोषणाचा इशारा नेरळ,ता.

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत;- कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील धोत्रेवाडी येथील नळपाणी योजना जलजीवन मिशन मधून राबविण्यात येत आहे. ८१ लाख खर्चून शासनाने या ठिकाणी नळपाणी योजना राबविली असून या नळपाणी योजनेचे पाणी आदिवासी लोकांच्या घरात पोहचले नाही.त्यामुळे सदर नळपाणी योजनेची चौकशी करण्याची मागणी आणि प्रसंगी आंदोलन तसेच उपोषण करण्याचा इशारा धोत्रेवाडी मधील आदिवासी ग्रामस्थांनी तालुक्याचे तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.

पाथरज ग्रामपंचायत तील मौजे धोतरे गाव व दोन धोत्रेवाडी अशी ८१ लाखांची शासनाने जलजीवन योजना राबवुनही एक वर्ष होऊन गेले तरी आमच्या दोन्हीही आदिवासी वाडयांना हर घर नल या योजने पासून एक थेंबही पाणी मिळत नाही.दोन्हीही आदिवासी ठाकुर समाजाच्या वाड्या आहेत जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या ह्या वाड्या अनेक वर्षापासून टंचाई ग्रस्त आहेत. दोन्हीही वाड्यांना जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होईल या आशेने महीला वर्गात आनंदाचे वातावरण होते गेल्या कित्येक वर्षांपासून डोक्यावरचा हंडा हातात येईल का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत.
जलजीवन मिशन योजना एक गाव आणि दोन आदिवासी वाड्यांना राबविण्यासाठी ८१ लाखांची मंजूरी देऊन योजनाही पुर्ण झाली.मग दोन्हीही आदिवासी वाडयांना पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे? आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवले जात आहेत का? असा संशय आदिवासी ग्रामस्थांना आहे.या तालुक्याचे तहसीलदार आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन आदिवासी वाडी मधील नळाचे पाणी पळविणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हे निवेदन धोत्रेवाडी ग्रामस्थ भालचंद्र किसन मधे,राम कान्हु आगीवले,दत्तात्रय दरवडा,मारुती दरवडा,गणेश मांगे पाथरज ग्रामपंचायत सदस्य सुरेश दरवडा,जयराम दरवडा,काशिनाथ पादीर आणि कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.