माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचा विभागीय आयुक्तांकडून सत्कार
देवेंद्र भगत
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920
अमरावती, दि. 6 : अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना राज्य शासनाव्दारे नुकतीच नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयात ‘वस्त्रोद्योग आयुक्त’ पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. यानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी श्री. पंडा यांचा पुष्पगुच्छ देऊन आज सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. पंडा हे 2017 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी जवळपास तीन वर्षे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज केले. मेळघाटातील कुपोषण निर्मूलन, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, गावांचा सर्वांगिण विकास आदी कामांना प्राधान्य देत ते पूर्ण होण्याच्यादृष्टीने विशेष प्रयत्न केलेत. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण व बाधितांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करुन देण्याचे कामकाज त्यांनी उत्तमरित्या पार पाडले.
यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनीही वस्त्रोद्योग आयुक्त पदी नियुक्ती मिळाल्यानिमित्त श्री. पंडा यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.