शेवटी त्या सडलेल्या कुजलेल्या झाडाला तोडण्यात आले यश
झाड तोंडताना कुठलीही हानी नाही स्थानिक लोकांनी घेतला मोकळा स्वास
✍🏻रमा गवळी ✍🏻
क्राईम रिपोटर कल्याण
मो. 9967976880
मुंबई (कल्याण ) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आनंदवाडी बुद्ध विहार सरस्वती हायस्कुल वार्ड क्रमांक 94(कल्याण पूर्व ) येथे खूप जुने औदुबराचे झाड पूर्ण कुजलेल्या अवस्थेत होते यासाठी तेथील स्थानिक लोकांनी क्राईम रिपोटर रमा गवळी यांना सूचना दिली होती त्या नंतर रमा गवळी यांनी त्या कुजलेल्या झाडाची पाहणी करून तेथील कल्याण महानगर पालिकेच्या आयुक्त साहेबांकडे व तेथील वनविभाग यांना निवेदन दिले व त्या कुजलेल्या झाडाला लवकरात लवकर न तोडल्यास मोठी वित्त हानी व जीवित हानी होऊ शकते हे शासनाच्या निर्दशानस आणून दिले म्हूणन तेथील कल्याण वृक्ष प्राधीकरण विभाग :क. डों. म. पा. कल्याण, वृक्ष अधीकारी:श्री. जाधव साहेब तामोरे.साहेब तसेच
उद्यान विभागाचे(वृक्ष छाटणी विभाग)विलास बाबर यांनी आज दिनांक 5-2-2025 रोजी जीर्ण अवस्थेत असलेले औदुंबराचे झाड त्यांच्या कामगार लोकांकडून छाटण्यात आले, विलास बाबर यांनी घटनास्तळी काम करत असताना कुठलीही दुर्घटना न होऊ देता चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन जे सहकार्य केलं त्या बद्दल (क. डों. म.पा. कल्याण. वृक्ष अधिकारी तसेच उद्याण विभाग यांचे तेथील स्थानिक लोकांनी व स्वतंत्र पत्रकार संघ (श्री:रमा गवळी प्रेसिडेंट महाराष्ट्र /महाराष्ट्र गुन्हे समाचार क्राईम रिपोर्टर ) यांनी मानले आभार