चोरांनी मारला महापालिकेच्या गटारांच्या झाकणानवर डल्ला, झाकने नेली चोरून.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞7304654862 📞
मुंबई :- चोरांचा अजब कारनामा, जुहू येथील 10 रोड वरील जमनाबाई इंग्लिश स्कूल मधे जाणाऱ्या गल्लीमध्ये अज्ञात चोरट्यांनी माध्यरात्रीच्या सुमारास नुकत्याच झालेल्या नवीन सिमेंट काँकरीट च्या रस्त्यावरील गटारांचे नवीन कोरे झाकने चोरून न्हेण्याची घटना काल रात्री घडली.
जुहू मधे उचभ्रू लोंकाची राहण्याचे निवास स्थान असून तिथे सिने अभिनेते वास्तव्याला आहेत. तसेच काही दिवसातच जमनाबाई इंग्लिश स्कूल मधे जाण्याच्या गल्लीमध्ये नवीन सिमेंट काँक्रेट चे काम केले होते, व रस्त्याच्या साईडला गटार लाईन ही नवीन बांधण्यात आली होती, त्याच गटारावरील झाकने चोरून नेण्याचे काम चोरट्यांनी अगदी हुशारीने केल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे गल्लीच्या दोनी बाजूस इमारती आहेत, व प्रत्येक इमारतीमध्ये वॉच मन आहेत, तरी सुद्धा असा प्रकार घडला. जुहू मधे गेले चार दिवस थंडी वाढल्याने, व बाजूलाच समुद्र किनारा असल्याने या भागात थंड हवा येत राहते, त्यामुळे वॉच मन च्या साखर झोपेमुळे हा सर्व प्रकार घडला असावा, हे नाकारता येणार नाही.
या आधी जुहू व जुहू च्या प्रत्येक गल्ली आणि अति महत्वाच्या ठिकाणी जुहू पोलिसांची रात्रीच्या वेळी गस्त घातलेली पाहवयास मिळते, परंतु मागील आठवड्यापासून ना पोलिसांची गस्त आहे ना पेट्रोलिंग याचाच फायदा व दिवसा चोर रेकी करून गेल्यावर, रात्री काम फत्ते केला असा अंदाज व्यक्त करणं वावगं नाही.
सदर चोरून नेलेल्या गटारांची झाकण ब्रास धातू ची आणि वजनदार असल्याने त्यांची बाजार भाव किंमत जास्त आहे, म्हणून चोरांनी त्यांचा मोर्चा गटारंच्या झाकणनवर वळवला व चोरून नेली. आता अजून कुठे -कुठे गटारांची झाकण चोरीला जातील सांगता येणार नाही, कारण सध्या मुंबई खड्डे मुक्त बनवण्यासाठी महापालिकेने कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँकरीड चे रस्ते मुंबईकरांच्या सुखकर प्रवासा साठी बांधण्यात येत आहेत, महापालिकेच्या या निर्णयाने काही वर्षातच संपूर्ण मुंबई खड्डे मुक्त होणार, या मधे काहीच शंखा येण्यासारखं नाही, पण जर अशा प्रकारे चोर जर सार्वजनिक मालमत्तेची लूट करत असतील तर पालिकेने पोलीस प्रशासनाला तसे आदेश द्यायला पाहिजेत, जेणे करून अशा घटनाना आळा बसेल.
मुंबई चे पोलीस प्रशासन अत्यंत हुशार व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलिसांच नांव अगदी गर्वाने घेतले जाते, परंतु जर अशा छोट्या -छोट्या चोरीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण छोटे -छोटे करून कधी मोठी घटना घडेल कुणालाच सांगता येणार नाही म्हणून पहिलेच सावध राहण्यातच हुशारी आहे.पोलिसांनी त्यांचं काम अत्यंत सावधगिरीने केल पाहिजे, कारण आता थोडे दिवस थंडीचे आहेत. याच दिवसात चोर चोरी करण्याचे प्रयत्न करत असतो. तरी सदर घटनेची चौकशी करून, पुढील कुठलीच घटना परत घडू नये यासाठी सतर्क राहायला पाहिजे.