ठाण्यातील घोडबंदर रोड वर अपघात. अपघात, 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.

52

ठाण्यातील घोडबंदर रोड वर अपघात. अपघात, 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.

 Accident on Ghodbunder Road in Thane. Accident, death of a 5-year-old boy.

Accident on Ghodbunder Road in Thane. Accident, death of a 5-year-old boy.

ठाणे, शुक्रवार,5 मार्च:- ठाण्यातील घोडबंदर रोड वर अपघात. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बाइक रस्त्यावरुन घसरल्यामुळे ठाणे मनपाच्या पाण्याच्या टँकरला धडकली. बाइकवर आईवडिलांसह पाच वर्षांचा मुलगा बसली होती. अपघातात मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव आरुष जाधव असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातामध्ये आरुषचे वडील राजेश जाधव 33 आणि आई दर्शना जाधव 29 जखमी झाले. घोडबंदर रोडवरील अपघातांप्रकरणी पोलिसांनी आवश्यक त्या नोंदी करुन घेतल्या आहेत. अपघात प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

घोडबंदर रोड हा ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. हा सुमारे 20 किमी लांबीचा मार्ग मुंबई महानगर क्षेत्रातील एक प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याची राज्य महामार्ग 42 अशीही एक ओळख आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी जंक्शन येथून घोडबंदर रस्त्याची सुरुवात होते. हा रस्ता पुढे दोन दिशांना जातो. घोडबंदर रोड एकीकडे पूर्व द्रुतगती महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 तर दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 जाऊन मिळतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.