कर्मचा-यांचा अरेरावी, मनमानी कारभारामुळे, भूमी अभिलेख कार्यालयास भाजप ठोकणार टाळे.
✒आशीष अंबादे प्रतिनिधी✒
पवनी, दि. 6 मार्च:- भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथील कर्मचा-यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर्मचाऱ्यानी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना वेळेवर कागदपत्राची पूर्तता व्हावी अन्यथा भारतीय जनता पार्टी पवनी तालुक्याच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयास ताला ठोकण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन आज 4 रोजी तहसीलदारांना देण्यात आले.भूमी अभिलेख कार्यालय पवनी येथे अनेक दिवसापासून कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे, मनमानी कारभारामुळे, अरेरावीपणामुळे व वेळेवर कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आखीव पत्रिका तीन दिवसात मिळणे अपेक्षित असताना याकरिता दहा-पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे. साधारण, तात्काळ व अती तात्काळ मोजणी करायची असल्यास सहा महिने किंवा वर्षभरानंतर मोजणी होते. क- प्रत आठ दिवसात मिळण्याऐवजी महिना दिली जात नाही. वारसाना व खरेदी-विक्रीचे फेरफार वेळेत होत नाही. जमीनचे वर्ग बदल करण्यासाठी एक-एक महिना कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करून नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास कार्यालयास ताला आंदोलन करेल अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोहन सूरकर, राजेंद्र फुलबांधे, संदीप नंदरधने, शरद देव्हाळे, प्रकाश कुर्जेकर, हिरालाल वैद्य, लोकेश दळवे, परसराम हुकरे, शंकर सूरपाम उपस्थित होते.