मराठी राष्ट्रभाषा दिनानिमित्त दशरथ ढोकपांडे यांच्या सत्कार करण्यात आला.

59

मराठी राष्ट्रभाषा दिनानिमित्त दशरथ ढोकपांडे यांच्या सत्कार करण्यात आला.

 Dashrath Dhokpande was felicitated on the occasion of Marathi National Language Day.

Dashrath Dhokpande was felicitated on the occasion of Marathi National Language Day.

✒प्रशांत जगताप प्रतिनिधी✒

हिंगणघाट:- मागील बत्तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी दशरथ ढोकपांडे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन मराठी राजभाषा दिनानिमित्त सन्मान पत्र व वृक्ष शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी म.न .से जिल्हा उपाध्यक्ष अमोलभाऊ बोरकर, मनसे जिल्हा सचिव सुनील भुते, मनसे जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना रमेश घगारे, मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मनसे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना राहुल सोरटे, मनसे रुग्ण सेवा जिल्हा अध्यक्ष उमेश नेवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती व “रुचिक “मसाला चे संचालक शिवम दशरथ ढोकपांडे, सुचिता ढोकपांडे, रचना ढोकपांडे व मॅनेजर मंगेश ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.