Figure / Hub Town Developer Vimal Shah should be charged with 420 counts: - Panther Dr. Rajan Makanikar
Figure / Hub Town Developer Vimal Shah should be charged with 420 counts: - Panther Dr. Rajan Makanikar

आकृती/हब टाऊन विकासक विमल शहा वर 420 अनव्ये गुन्हा दाखल व्हावा:- पँथर डॉ. राजन माकणीकर

Figure / Hub Town Developer Vimal Shah should be charged with 420 counts: - Panther Dr. Rajan Makanikar
Figure / Hub Town Developer Vimal Shah should be charged with 420 counts: – Panther Dr. Rajan Makanikar

मुंबई, दि.6 मार्च ( प्रतीनिधी) आकृती/हब टाऊन विकासक विमल शहा व त्याच्या साथीदारांवर 420 अंनव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी पक्षाच्या वतीने केली आहे.

विकासक कार्यालयात विकासकाच्या वतीने समीर सावंत ही व्यक्ती 2017 ते 21019 पर्यंत कार्यरत होती. इमारत क्रमांक 5, पॉकेट क्रमांक 3 या इमारती निर्माणाधिन होत्या. मात्र: आज तारखेपर्यंत अंदाचे 120 ते 130 सदनिका रिक्त असतांना समीर सावंत यांच्या स्वाक्षरीनिशी 2018 चे ताबापत्र वितरित केले जात असून हा फार मोठा भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे.

एका व्यक्तीस सदनिका किंवा गाळा वितरित केल्यास 2018 मध्ये पुन्हा 2021 मध्ये तेच गाळे त्याच सदनिका अन्य व्यक्तीला अंदाजे 6 लाख रुपये रक्कम घेऊन ताबापत्र वितरित करण्यात आले आहे. असे प्रकार बहुतांश जाणवत आहेत, यावर प्रतिबंध ८आणणे फार महत्वाचे आहे.

Figure / Hub Town Developer Vimal Shah should be charged with 420 counts: - Panther Dr. Rajan Makanikar
सदर प्रकरनात ताबा पत्र लिहिणारा, बनवणारा, सही करवणारा इसम हा महादलाल मुरजी कांजी पटेल व विकासक विमल असून वाटप करणारा राहुल मौर्य आहे, त्यामुळे या दलाल महादलाल व चोराची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

सदर प्रकरणात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून अंदाजे 10 हजार कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आलेली आहे. म्हणून उद्योग सारथी चे अधिकारी, राजेंद्र केंद्रे, संतोष करंडे, सुधीर अंभोरे व उत्तम निकाळजे या अधिकाऱ्यांची प्रकल्प पूर्ण होई पर्यंत बदली करू नये अशी इच्छा विनंती सुद्धा डॉ. माकणीकर यांनी केली आहे.

एकंदरीत या प्रकल्पात आदर्श पेक्षा फार मोठा घोटाळा झाला असून सुरुवातीपासून सर्व अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी होणे आणि विकासक ने शासनासोबत आणि झोपडपट्टी वाशीयांसोबत फार मोठी फसवणूक केली असून विकासकावर 420 कलमांनव्ये कारवाई करण्यात यावी अशी मागावी पक्षाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती डॉ माकणीकर यांनी प्रसिद्धी मध्यंमांना दिली आहे.

सदरचा घोटाळा जनतेसमोर उघड करून खऱ्या चोरांना शासन करण्यासाठी डॉ. राजन माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड पक्षप्रमुख कनिष्क कांबळे युद्धपातळीवर लढा देत असून लवकरच हे प्रकरनाची जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here