कळमेश्वर तालुक्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

55

कळमेश्वर तालुक्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात.

 In the net of corrupt Talathi ACB in Kalmeshwar taluka.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतीनिधी✒

नागपूर/कळमेश्वर, दि. 6 मार्च:- शेती नावावर करून फेरफार नोंद करण्यासाठी 10 हजाराची मागणी करणार्‍या एका लाचखोर तलाठ्याविरुद्ध सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. नितीन प्रेमनाथ निमजे असे या तलाठ्याचे नाव असून तो कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथे कार्यरत आहे.

तक्रारदार हे म्हसाळा टोळी येेथे राहत असून शेती करतात. मागील वर्षी त्यांनी तेलगाव येथील शेतमालका कडून 0.81 हेक्टर आर शेतजमीन खरेदी केली होती. या शेतीचे फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी कळमेश्वर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला होता. शेतीचा फेरफार करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी निमजेच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. त्यावेळी निमजेने तक्रारदाराला दहा हजाराची मागणी केली. तक्रारदाराला दहा हजाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पो. नि. सारंग मिराशी यांनी शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. 5 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी तलाठी कार्यालयाभोवती सापळा रचला असता निमजेने पैसे घेण्याची तयारी दर्शविली. परंतु, पैसे घेतले नाही. निमजेने पैसे घेण्याची तयारी दर्शविल्याने शुक्रवारी त्याच्याविरोधात सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तलाठी निमजे यास ताब्यात घेण्यात आले.