सोशल मीडियामुळे विध्यार्थी वर्गाची एकाग्रता भंग, मुलांचा अभ्यास होऊनही आत्मविश्वास ढळू लागला.
✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रातिनिधि✒
वाढोणाबाजार, दि.6 मार्च:- शाळा व कॉलेज जीवनातील प्रत्येक परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी प्रत्येक विध्यार्थी धडपडत असतो. विशेषतः परीक्षेच्या काळात मुले नर्व्हस होतात अभ्यास होऊनही आत्मविश्वास ढळू लागतो. प्रत्येक परीक्षेत आपला अभ्यास चांगला राहावा, यासाठी प्रत्नशील राहणारी मुले येनवेळी आत्मविश्वास गमावून बसतात व पेपर मध्ये लिहित नाही. याचे मुख्य कारण आहे सोशल मीडिया सध्या अभ्यासातील मोठा अढथळा हा सोशल मीडियाचा आहे यामुळे विद्यार्थ्यांची ऐकण्याची व पाहण्याची सवय वाढल्याने लिहिण्याकडे फक्त त्यानी पाठ फिरविली आहे. दिवसेंदिवस फेसबुक, इन्स्ट्राग्राम, वॉट्सअप, टेलिग्राम, युट्युब यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटमुळे महाविद्यालइन विद्यार्थ्यांनसह शाळकरी मुलांनचीही एकाग्रता भंग पावली आहे. या मोहजाळातून विद्यार्थ्यांणि बाहेर पडणे गरजेचे आहे. आपले अकाउंट डीऍक्टिवेट करून चॅटिंग पासून काही दूर राहावे जो पर्यंत आपल्या परीक्षा संपत नाही तो पर्यंत सोशल मीडिया पासून चार हात लांब राहावे पालकांनी मोबाईलवर नियंत्रण ठेवत स्वयंशिस्त व संवाद वाढविला तर हि समस्या कमी होण्यास मदत होईल तालुक्यातील सुज्ञ पालकांनी आपल्या पाल्यांना सोशल मीडियातील व्यसनापासून दूर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शैक्षणिक प्रगतीवर होतो परिणाम.
सोशल मीडियायाचे व्यसन हा जरी स्वतंत्र मानसिक आजार मानला जात नसला, तरी हा इंटरनेट व्यसनाच्या प्रकार आहे सर्वच वयोगटातील सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराच्या केसेस मनोसोउपचारतज्ञाकडे आणि समुपदेशकांकडे येत आहेत. यात 10 ते 18 वयोगटातील मुलांच्या आणि 18 ते 30 वयोगटातील तरुणांचे प्रमान 70 टके आहे. साधारणपणे 80ते 90टके वाढ अशा प्रकारच्या दिसून येत आहे यामुळे विध्यार्थ्यांनाच्या शैक्षनिक प्रगतीवर मोठया प्रमाणात परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडत आहे.
सोशल मीडियामुळे विद्यार्थी वर्गावर दुष्परिणाम.
सोशल मीडिया मुळे आई वडिलांनी मुलाला कोणत्याही काम सांगितले असता तो मुलगा आई वडिलांना टाळाटाळ करत असतो. यामुळे आपला मुलागा का बर असा वागतो हे आई वडिलांना कळत नाही. त्यामुळे या सोशल मीडियाचा वापर आपल्या मुलांनाकडून कमी करून घ्यावा व शिक्षणाची जाणीव करून दयावी. असे सुज्ञ पालकांन कडून बोलले जात आहेत.