हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर गावातील रोडची अवस्था फार बिकट.
बांधकाम विभागाला सुचना करुण दुर्लक्ष करत असाल तर मला या रोडवर उपोषनाला बसायची तयारी करावी लागेल. निखिल वाघ युवासेना तालुका प्रमुख, हिंगणघाट.

✒मुकेश चौधरी प्रतीनिधी✒
हिंगणघाट, दि. 6 मार्च:- तालुक्यातील बोपापुर येथील रोडची खुप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा मध्ये या रोड नी पायदळ चालने खुप कठीण झाले आहे.या रोड वर एक खुप मोठा नाला पडतो,या नाल्यावरील पुलाच्या वरील बाजुला काही ठिकाणी तडा गेल्या मुळे मोटरसायकल चालवणार्या व्यक्ती साठी जीवघेणे स्थळ निर्माण झाले आहे.या रोड नी रात्री बे रात्री यावे लागते .खुप मोठा गिट्टीचा थर रोडवर साचल्या मुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वरुण बोपापुर गे गांव 2.5 कि. मी.आहे .1 कि.मी.रोड ची दैना खुप बिकट झाली आहे. अपघात कधी होईल याचा कधी नेम नाही. बोपापुर गांवाचा मुख्य रस्ता असल्या मुळे हा रस्ता होणे खुप गरजेचे आहे. रात्री बे रात्री या रोड नी येणे जाणे खुप कठीण झाले आहे. बांधकाम विभागाने या कडे थोड लक्ष द्यावे आणि रोडचे काम सुरु करावे. गांवातिल लोकांच्या या बाबत रोडच्या तक्रारी येत आहे. गांवातिल एक नागरिक म्हणुन गांवातिल लोकांच्या समस्या सोडवासाठी सदैव सोबत आहे. या एका महीण्या मध्ये बोपापुर रोड चे काम नक्की सुरु करायला भाग पाडील आणि लोकप्रतीनीधी कुठे हरवले आहे. हे गांवातिल जनतेनीच शोधावे.

लोकांना किती त्रास सहन करावा लागत आहे या रोड मुळे. सदर 1 कि.मी.रोड चे काम त्वरीत सुरु करण्यात यावे. वारंवार बांधकाम विभागाला सुचना करुण दुर्लक्ष करत असाल तर मला या रोडवर उपोषनाला बसायची तयारी करावी लागेल. या एप्रिल महिण्या पर्यंत रोडचे काम सुरु झाले नाही तर शिवसेना युवासेने च्या वतिने मी निखिल अशोकराव वाघ युवासेना तालुका प्रमुख,हिंगणघाट ग्रामिण याच रोड वर उपोषणा बसेल. 1 कि.मी. रोड हा पुन्हा डांबरीकरण झाला पाहिजे. बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांनी ग्रामिण भागातिल रोडची पाहणी करावी. कुठे काय अडचणी आहे हे तुम्हाला कळेल. वर्षाला खराब रोड मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. थोडी काळजी घेत ग्रामिण भागात बांधकाम विभागाने लक्ष द्याव.