महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध पिण्याचा भाविकांनी घेतला अनुभव हि श्रध्दा आहे ॽ कि अंधश्रद्धा ॽॽ

महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध पिण्याचा भाविकांनी घेतला अनुभव
हि श्रध्दा आहे ॽ
कि अंधश्रद्धा ॽॽ

महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध पिण्याचा भाविकांनी घेतला अनुभव हि श्रध्दा आहे ॽ कि अंधश्रद्धा ॽॽ

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यूज
मों.नं.9623754549

धुळे– काल महादेवाच्या मंदिरात नंदी ला पाणी व दुध पाजण्याचा प्रयोग भाविकांनी केला नंदी पाणी व दुध पित असल्याचा अनुभव भाविकांनी घेतला हि श्रध्दा आहे ॽ कि अंधश्रद्धा ॽ हा संशोधनाचा विषय बनला आहे 1 मार्चला महाशिवरात्री होती महा शिवरात्री म्हणजे शंकर पार्वतीचा शुभ विवाह झाला तो दिवस होता म्हणून महाशिवरात्री एक पवित्र रात्र आहे अशी समज असल्याने महादेवाची भक्ती आणि शक्ती ने भाविक पुजा करतात त्यादिवशी उपवास ठेवला जातो आणि महादेवाचे दर्शन घेतात व मनोकामना पुर्ण होते अशी भक्ताची श्रध्दा आहे. महाशिवरात्री गेल्यानंतर काल अचानक महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध पित आहे अशी चर्चा शहरात व सोशल मिडीयावर पसरली अनेक भक्त महिला महादेवाच्या मंदिरात जाऊन नंदीला दुध पाजून पुंण्याचे काम करून घेतले हा प्रकार फक्त धुळे जिल्ह्यात असेल असे वाटले परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हा प्रकार घडला आहे हि श्रध्दा आहे कि अंधश्रद्धा ॽ असा प्रश्न मनात पडला परंतु एक सोबत एकाचं वेळी अनेक मंदिरातला फक्त नंदी पाणी व दुध कसा पिऊ शकतो कारण दुध आणि पाणी वेगवेगळे पित होता बिना पाण्याचं दुध मिळत नाही दूधात पाणी मिस्स असेल जर नंदीला जर दुध व पाणी पियायचेच होते तर महाशिवरात्रीला का ? पिलं नाही महाशिवरात्रीला तर भाविकांनी दुध व पाणीसह प्रसाद दिला होता त्यावेळी नंदी ला भुक लागली नसेल का ? आज अचानक नंदी पाणी व दुध पित असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती या गोष्टीला विज्ञान मानत नाही कारण पृष्ठीयताण व सरफेस स्टेन्शन मुळे हा प्रकार होतो असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सर चिटणीस श्री.सावळे यांनी सांगितले आहे.हीअंधश्रद्धाच आहे या गोष्टी वर सामान्य जनतेने विश्र्वास ठेवू नये असे सांगितले आहे श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी…..