घुग्घुस परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ
ठाणेदाराचे दुर्लक्ष
🖋️साहिल सैय्यद
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घुस :परिसरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये रात्रीच्या सुमारास वाढ झाली आहे. घुग्घुसचे नवनियुक्त ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या समोर चोरट्यांनी आवाहन उभे केले आहे.
शेणगाव फाट्याजवळ एका ट्रान्सपोर्ट मालकाच्या उभ्या जडवाहनातून रात्रीच्या सुमारास जवळपास ३५० लिटर डिजल चोरी गेल्याची घटना घडली तसेच वढा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून ट्रॅक्टरचे विविध साहित्य चोरी गेल्याची ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
नवनियुक्त ठाणेदार श्याम सोनटक्के अशा चोरट्यांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरतांना दिसत आहे.
यापूर्वीचे ठाणेदार आसिफराजा शेख यांची गुन्हेगारांवर चांगलीच वचक होती परंतु त्यांची बदली बल्लारपूर येथे होताच चोरट्यांची टोळी घुग्घुस शहरात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
नवनियुक्त ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या बदलीची मागणी जोर धरत असल्याची चर्चा घुग्घुस शहरात जोरदार सुरु आहे.