रायगड नागरी प्रकल्पातील म्हसळा शहरातील १० अंगणवाडी यांच्या वतीने लेक लाडकी योजनेची पथनाट्यव्दारे केली जनजागृती.
२०२३ नंतर जन्मलेली मुलगी हिची शासन दरबारी नोंद घेऊन लागणारी कागदपत्रे पुर्तता करून
या योजनेचा लाभ घ्यावा..
वैद्यकीय अधिक्षक महेश मेहता यांनी जनजागृती मोहिमेत नागरिकांना केले आवाहन
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा : – राज्य सरकारच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी तसेच लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे, १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, मुलींना सशक्त व स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. १ एप्रिल पासून मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी १ ली इयत्तेत गेल्यावर सहा हजार रुपये व ६ वी इयत्तेत गेल्यानंतर सात हजार रुपये तसेच मुलगी ११ वीत गेल्यावर आठ हजार रुपये, मुलगी १८ वर्ष पुर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळणार एकुण मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या अठराव्या वर्षी पर्यंत मुलीला राज्य सरकार कडून एकुण एक लाख एक हजार रुपये लाभ दिला जाणार असून याच अनुशंगाने रायगड नागरी प्रकल्पातील म्हसळा शहरातील दहा अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी ही योजना प्रत्येक नागरिकांना व विषेश करून महिलांना समजावी म्हणून लेक लाडकी योजना जनजागृती मोहीम हातामध्ये घेऊन गाण्यामधुन व पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली, सदर कार्यक्रम म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे घेण्यात आला या वेळी कार्यक्रम ठिकाणी बोलताना म्हसळा वैद्यकीय अधिक्षक महेश मेहता यांनी सांगितले की १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी असेल तर त्याची शासन दरबारी नोंद घेऊन लागणारी सर्व कागदपत्रे यांची पुर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा असे मोहिमेत नागरीकांना आवाहन केले तसेच एक मुलगी शिकली तर कुटुंब शिकते म्हणून एका महिलेचे समाजामध्ये योगदान खूप महत्त्वाचे आहे.असे देखील सांगितले व सर्व अंगणवाडी सेविका यांना सांगणे आहे की या योजनेची नोंदणी शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी व लाभ मिळवून द्यावा, तसेच अंगणवाडी सेविका सानिका उध्दरकर यांनी या जनजागृती मोहिमेत लेक लाकडी योजना स्व लिखित गाणे सादर करून नारिकांचे लक्ष वेधले , तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पथनाट्य मध्ये अंगणवाडी सेविकेची भुमिका अमिता कर्णिक यांनी उत्तम प्रकारे सादर केली, व मयुरी दर्गे यांनी मुलीच्या आईची भूमिका केली,या वेळी उपस्थित नगरपंचायत नगराध्यक्ष संजय कर्णिक, वैद्यकीय अधिक्षक महेश मेहता, नगरपंचायत म. बा. सभापती जयश्री कापरे, डॉ. फराह जलाल, डॉ. भावना अर्बन, म्हसळा दहा अंगणवाडी मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते . विषेश म्हणजे या जनजागृती मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थीनी व न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थीनी सहभागी झाले होते.