महाराष्ट्रातुन भगवाधारी प्रतिष्ठान द्वारे अयोध्या नगरी मध्ये भव्य दिव्य दिपोउत्सव…

महाराष्ट्रातुन भगवाधारी प्रतिष्ठान द्वारे अयोध्या नगरी मध्ये भव्य दिव्य दिपोउत्सव...

महाराष्ट्रातुन भगवाधारी प्रतिष्ठान द्वारे अयोध्या नगरी मध्ये भव्य दिव्य दिपोउत्सव…

महाराष्ट्रातुन भगवाधारी प्रतिष्ठान द्वारे अयोध्या नगरी मध्ये भव्य दिव्य दिपोउत्सव...

उल्हास पुराडकर,
पनवेल विभाग प्रतिनिधी
७०२८०९८६४२

पनवेल: भगवाधारी प्रतिष्ठान चे संचालक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश नायर साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. कृष्णा चव्हाण व श्री. राजेश नारायण, राष्ट्रीय सचिव श्री रमेश अय्यर आणि राष्ट्रीय खजिनदार श्री. विजय सप्पांनी यांच्या राम भक्तीतुन एक आगला वेगळा विचार आला की महाराष्ट्रातून घरा घरातून दिवे घेवून हे दिवे श्री राम चरणी अर्पण करावे. या विचाराने प्रेरित होऊन भगवाधारी प्रतिष्ठान कार्यकारिणीने दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमाने प्रत्यक्ष रित्या घरोघरी जाऊन हया विचारांची स्वप्णपुरती करत मोलाची कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र अध्यक्ष श्री. नितीन चौधरी, सचिव श्री. अंकुश पार्टे, घाटकोपर अध्यक्ष श्री. निवृती उतेकर, पनवेल अध्यक्ष श्री. शिवाजी उतेकर आणि संपूर्ण स्थानिक कार्यकर्ते या सर्वांचे काम अवर्णनीय आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत कार्यकारिणीने १२,१०० मातीचे दिवे देणगीच्या स्वरुपात गोळा करून सरळ महाराष्ट्रातून अयोध्या येथे बस द्वारे नेण्यात आले.
अयोध्या मध्ये शरयू नदीच्या घाटाजवळ ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी हे दिवे प्रज्वलित करून प्रभु राम चरणी अर्पण केले. सायंकाळी दिवे प्रज्वलित केल्यानंतर चे द्दृष्य अवर्णनीय होते; संपुर्ण परिसर राम रूपी झाला होता.
भगवाधारी सेनेच्या अशा प्रयत्नातुन खर्‍या अर्थाने सनातन कार्याची ओळख दिसून येते आणि असे अनेक कार्यक्रम करण्यासाठी भगवाधारी प्रतिष्ठान नेहमीच सज्ज असते. याबरोबरच गोर गरिबांच्या मदतीला धावणे, लहान मुलांना शाळेय शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तुचे वाटप करने, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यां व्यक्तीना छोट्या मोठ्या आजारात आर्थिक मदत करने अशी अनेक सामाजिक उपक्रम भगवाधारी प्रतिष्ठान व्दारे केली जात आहेत. भगवाधारी प्रतिष्ठान अखंड हिंदु समाजाला एकत्र आणण्याचे धार्मिक कार्य करत आहे आणि त्यांच्या या मोलाच्या कार्याला अनेक सलाम.