तळा तालुक्यातील कै.अशोक ल. लोखंडे माध्यमिक विद्यामंदिर पिटसई तालुक्यात प्रथम. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा..

तळा तालुक्यातील कै.अशोक ल. लोखंडे माध्यमिक विद्यामंदिर पिटसई तालुक्यात प्रथम. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा..

तळा तालुक्यातील कै.अशोक ल. लोखंडे माध्यमिक विद्यामंदिर पिटसई तालुक्यात प्रथम.

संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा..

तळा तालुक्यातील कै.अशोक ल. लोखंडे माध्यमिक विद्यामंदिर पिटसई तालुक्यात प्रथम. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा..

✍🏻किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
90285 58529

तळा : – पिटसई  विभाग ज्ञान प्रसारक मंडळ पिटसई संस्थेचे कै.अशोक लक्ष्मण लोखंडे विद्यामंदिर या शाळेला “मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा” या अभियानांतर्गत माध्यमिक विभागात तालुक्यात प्रथमक्रमांकमिळालाआहे.राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळासुंदरशाळाहेअभियान१जानेवारीते१५फेब्रुवारी  पर्यंत राबवण्यात आले होते त्यामध्ये राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने शालेय उपक्रम व मूल्यमापन करून मूल्यांकन केले तळा पिटसई येथील हायस्कूल ला प्रथम क्रमांक दिला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात ३ लाखाच्या बक्षिसास शाळा पात्र झालेली आहे..

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेचे सर्व निकष शाळेने पूर्ण केले असून शाळेचे सुशोभीकरण,  रंगरंगोटी, प्रबोधनात्मक विचार, सुविचार ,बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची बचत बँक,परसबाग,अमृतवाटिका, नवभारत साक्षरता,मेरी माटी मेरा देश अभियान,पोषण आहार महावाचन चळवळ,१००% उपस्थितीसाठी शाळेने राबवलेले उपक्रम, वक्तृत्व, हस्ताक्षर, निबंध, पोस्टर ,चित्रकला यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा, स्वच्छता मॉनिटर, विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शासकीय क्रीडा स्पर्धेत मिळवलेले यश,प्लॅस्टिक मुक्त शाळा,तंबाखूमुक्तशाळा, तसेच इयत्ता दहावी उत्कृष्ट टक्केवारीच्या निकालाची परंपरा, स्कॉलरशिप, एन. एम .एम .एस. परीक्षेत मिळालेले भरीव यश, विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, राबवलेले अभिनव उपक्रम, सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा,डिजिटलक्लासरूम या सर्व बाबींचा विचार  करण्यात आला होता.त्यामुळे

मुल्यमापन समीतीने प्रथम क्रमांक व ३ लाख रुपये बक्षीसाचे मानकरी झाली.याकामी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट मॅडम, केंद्रप्रमुख पिटसई सुधीर जाधव ,सर्व विषय तज्ञ शिक्षण विभाग पंचायत समिती ,तळा यांचे मार्गदर्शन लाभले.कै.अशोक ल .लोखंडे विद्यामंदिर पिटसई या विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तळा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे .संस्थेचे अध्यक्ष मा. खेळू शेठ वाजे, सचिव मा.संजयजी रेडीज, सर्व संचालक,मुख्याध्यापक. एस. एम. रेडीज  यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, ग्रामस्थ,पालक यांचे सहकार्यामुळे शक्य झाले असे अध्यक्ष खेळू वाजे पत्रकाराशी बोलताना मत व्यक्त केले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.