तळा दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार. मा.पालकमंत्र्यांना निवेदन.
✍🏻किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
90285 58529
तळा :- तळा महसुली विभागात दुय्यम निबंधक कार्यालय हे महसूलीचे महत्वाचे कार्यालय असून गेले सहा महिने पेक्षा अधिक काळ हे कार्यालय आठवड्यातून एक दिवसच सुरु असते.अशा तक्रारी शिवसेना संपर्क शाखेत प्राप्त झाल्याने व नगरपंचायत गटनेत्या तथा महीला बालकल्याण सभापती नेहा पांढरकामे यांच्या कडे आल्याने पक्षाच्या वतीने पुढाकार घेऊन मा.पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना निवेदन सादर केले आहे.सदर कार्यालय हे पद रिक्त असल्याकारणाने दुय्यम निबंधकाकडे पाचतालुक्याचा अतीरिक्त भार असुन इतर पदे देखील रिक्त आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे आठवड्यातून एक दिवशी उघडले जाते.या दिवशी कनेक्टीव्हिटी नसेल किंवा वीजशट डाऊन किंवाइतरकामानिमित्ताने बंद असल्यास कामाचा खोळंबा व कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात व कामाचा निपटारा होत नाही. अशा त्रासाला सामोरे जावे लागते ग्रामीण डोगंराळ भागातून जनतेला विक्री व खरेदीदारांना त्रास होतो.या गंभीर समस्यांची दखल शिवसेना तालुका प्रमुख प्रध्दुम्न ठसाळ शहर प्रमुख राकेशवडके,कोअरकमिटी सदस्य लिलाधर खातू यांनी घेऊन मा.पालकमंत्री यांना निवेदन सादर केले.