सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा ‘ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा पुरस्कार प्रदान
♦️ प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांचा उत्कृष्ट ‘प्राचार्य प्रवर्तक’म्हणून गौरव
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 6 मार्च
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत येथील सरदार पटेल महाविद्यालयास २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ‘बी’ ग्रेड सह ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा दर्जा मिळाला आहे. नुकतेच एका सोहळ्यात सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांना उत्कृष्ट ‘प्राचार्य प्रवर्तक’ म्हणून गौरविण्यात आले. दरम्यान महाविद्यालयीन ‘करिअर कट्टा’चे डॉ. प्रकाश बोरकर यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, तर प्रा. संदेश पाथर्डे यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांना उत्कृष्ट ‘प्राचार्य प्रवर्तक’ म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदूस्थानी ठेवत सतत वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत आहेत.’करिअर कट्टा’ मध्ये सुद्धा महाविद्यालयाच्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी ‘उत्कृष्ट जिल्हा समन्वयक’ डॉ. प्रकाश बोरकर यांना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे प्रमाणपत्र देत यावेळी सत्कार करण्यात आला. सतत चार वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे असणारे सरदार पटेल महाविद्यालय याही वर्षी चार पुरस्कार घेत अग्रक्रमी आहे हे विशेष.
नागपूर येथे झालेल्या विभागीय पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्रा. संदेश पाथर्डे यांना सुद्धा नागपूर येथे झालेल्या विभागीय पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्यासह या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.