ब्लॉक नसल्याने मातीतूनच करावी लागते पायपीट.

मालाड मुलुंड लिंक रोड च्या फुट पाथ ची दैनई अवस्था, पेवर ब्लॉक नसल्याने मातीतूनच करावी लागते पायपीट.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- मालाड इनबॉरबीट मॉल सिग्नल च्या समोर मालाड मुलुंड लिंक रोड च्या फुट पाथ ची अक्षर्ष दैनई अवस्था झालेली असून, मातीतूनच पादचाऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. मुंबईत एवढे रोड ची कामे चालू असता, सदर फुटपाठ ची झालेली अवस्था तिथल्या म. न. पा. केला दिसत नसावी, म्हणून कदाचित फुट पाथ च्या कामाला दिरंगाई होताना दिसून येते.

फुट पाथ च्या दैनिय अवस्थे मुळे तिथून येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसते, मातीतून चालताना कपडे खराब होणे, हवेमुळे माती अंगावर उडून नाकात जाणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते, पण याकडे म. न. पा. चे दुर्लक्ष झाल्याने, फुथ पाथ चं काम अजून अखेरची घटका मोजताना दिसून येते.

मुंबईत सध्या महापालिकेने कामांचा झपाटा लावला असून, काही कामे अपूर्ण तर काही पूर्ण झालेली दिसून येतात तर काही कामे अजून प्रतीक्षेत असल्याचे दिसते, पण नागरिकांचे हाल जिथे होत असतील तर महापालिकेने हि बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. व अशी छोटी – मोठी राहिलेली कामे पूर्ण करून जनतेच्या सेवेत येणं गरजेचं आहे.

कारण त्या फुथ पाथ वरून हजारो लोकं पायपीट करत असतात. त्याच प्रमाणे समोरच लोअर गोरेगांव मेट्रो स्टेशन असून सकाळ संध्याकाळ मोठ्या वर्दळीचा रस्ता समजला जातो. एवढी लोकांची वर्दळ पाहता पालिकेने तात्काळ फुथ पाथ चं काम लवकर पूर्ण करण्याची मांगणी समस्त जनतेकडून होत आहे.