दारूड्या नव-याने घराला लावली आग; बायको आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू.
दारूड्या नव-याने घराला लावली आग; बायको आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू.

दारूड्या नव-याने घराला लावली आग; बायको आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू.

दारूड्या नव-याने घराला लावली आग; बायको आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू.
दारूड्या नव-याने घराला लावली आग; बायको आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू.

कर्नाटक, 6 एप्रिल :- कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यातुन एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका दारूड्या नव-याने स्वतःच्या घरात आग लावली त्यांत त्याचा चार मुलांसह सहा जणांचा जळुन मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी चार जणं होरपळले आहेत. मृतांमध्ये आरोपीची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार होळपरुन गंभीर झालेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्हातील विराजपेत तालुक्यातील मुगुतागेरी गावातील आहे. परीवाराची जाळून हत्या करणा-या नराधम आरोपी हा 50 वर्षांचा असून त्याचं नाव येरवरा भोजा असल्याचं सांगितलं जात आहे. भोजाला दारूचं मोठ्या प्रमाणात व्यसन जळल होते. तो सकाळ पासुन दारूच्या नसेत असायचा. यामुळे घरी रोज वाद होत होते. त्यामुळे त्याची बायको त्याचे घर सोडून भावाकडे राहायला गेली होती. दारू प्यायल्यानंतर तो बायकोला मारहाण करीत होता. यामुळे वैतागून पत्नी आपल्या भावाकडे निघून गेली होती. पत्नी गेल्यानंतर आरोपीला खूप राग आला. त्याने अनेकदा बायकोला घरी येण्यास सांगितलं, मात्र तिने ऐकलं नाही. शुक्रवारी दारूच्या नशेत आरोपी पत्नीच्या भावाच्या घरी तिला नेण्यासाठी गेला. घरात सर्वजण झोपलेले पाहून त्याने बाहेरून टाळं लावलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने घराबाहेर टाळं लावलं आणि छतावर चढला. यानंतर तेथील कौल हटवू लागला. त्या रिकाम्या जागेतून त्याने पेट्रोल टाकलं आणि आग लावली. पाहता पाहता आगीच्या ज्वाला दिसू लागल्या आणि बाहेरून टाळं लावलं असल्याने लोक मदतीसाठी ओरडत होते. आरोपीची पत्नी आणि मुलंदेखील घरात होते. पाहता पाहता ते आगीच्या जाळ्यात अडकले व यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कळताच आरोपीच्या पत्नीचा भाऊ घटनास्थळी आला व तो घरात अडकलेल्यांची मदत करू लागला. या प्रकरणात घरातील केवळ 4 जणांचा वाचविण्यात यश आले असून आरोपीची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here