अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हात सर्व दुकाने बंद.
अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हात सर्व दुकाने बंद.

अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हात सर्व दुकाने बंद.

कलम 144 लागू 30 एप्रिलपर्यंत वर्धा जिल्हातील दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश.

अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हात सर्व दुकाने बंद.
अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हात सर्व दुकाने बंद.

✒प्रशांत जगताप प्रतीनिधी✒
वर्धा,दि.6 एप्रिल:- जिल्हात करोनाच्या रुग्णसंख्या हररोज वाढत असल्याने वर्धा जिल्हाधिकारी यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता वर्धा जिल्हातील सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल्स, जिम 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणेही बंद राहणार आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश वर्धा जिल्हाचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढला आहे.

वर्धा जिल्हातील संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येण्यास मनाई आहे. वैध कारण, परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि जीवनावश्‍यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या वाहतुकीला निर्बंध असणार नाहीत.

अत्यावश्‍यक सेवा आणि संबंधित दुकाने, रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये,औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय, आरोग्य सेवा, भाजी मंडई, किराणा सामान दुकाने, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, सेवा, वृत्तपत्रे कार्यालये आणि पेट्रोल पंप तसेच खासगी संस्थाना सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या अटीवर आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे.

काय आहे नवीन आदेशात
⊗ सुरु असलेल्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य
लसीकरण झाले नसल्यास 15 दिवसांसाठी ग्राह्य असलेली आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक राहणार
फायनान्स संस्था, वकिलांची कार्यालये खुली राहतील.
कंपनी ओळखपत्राच्या आधारे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना ये-जा करण्यास परवानगी
⊗ धार्मिक स्थळे, उपासनेची ठिकाणे नागरिकांसाठी पूर्ण बंद
⊗ अत्यावश्‍यक सेवांच्या दुकानात सुरक्षित अंतराचे पालन बंधनकारक
⊗ रिक्षात चालक आणि दोन प्रवाशी, टॅक्‍सीत चालक आणि वाहनाच्या 50 टक्के क्षमतेएवढे प्रवासी असल्यास परवानगी
⊗ सहकारी, सरकारी, खासगी बॅंका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्था, विमा, आरोग्य विषय सुविधा सुरू राहणार
⊗ सरकारी कार्यालये 50 टक्के मनुष्यबळसह सुरू राहणार
⊗ वीज, पाणी, बॅंकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कंपन्या, सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहणार
⊗ 50 लोकांच्या उपस्थित लग्नाला परवानगी -अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी
⊗ रस्त्यावरील खाद्य पदार्थच्या गाडीवर पदार्थ खाण्यास मनाई, पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी
⊗ नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकास दंड करण्याची कारवाई

हे बंद राहणार !
सिनेमागृह, जिम, क्रीडा संकुल, स्पोर्टस क्‍लब संपूर्णतः बंद राहील. राहण्याची सुविधा असलेल्या हॉटेलचा अविभाज्य भाग वगळता संध्याकाळी सर्व रेस्टॉरंट बंद राहिल. हॉटेल पार्सल सुविधा सुरू राहील. सलून, ब्यूटी पार्लर, बंद राहणार, सर्व शाळा, महाविद्यालये, परीक्षेसाठी मर्यादेत शिथिल केले जातील. खासगी क्‍लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here