राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथे अभ्यास दौरा.

66

राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथे अभ्यास दौरा.

चंद्रपूरचे गटशिक्षणाधिकारी, चकनिंबाळा येथील सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तथा शिक्षकवृंद यांचा अभ्यास दौरा, सुटटीच्या दिवशी अभ्यास दौऱ्याचे नियोजन.

राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथे अभ्यास दौरा.
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथे अभ्यास दौरा.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर, ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा:- राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावाची नियमित पहाटे 4 वाजतापासून दोन तास श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यानी व फुलांनी नटलेला बगीचा, गावाच्या मध्यभागी असलेले सार्वजनिक वाचनालय. सुंदर शालेय परिसर, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण इत्यादी श्रमदानाची व विकास कामाची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रा. पं. व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चकनिंबाळा येथील सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तथा शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचा अभ्यास दौरा दिनांक 2/4/2021 रोजी सायंकाळी 5:00 आयोजित करण्यात आला.

स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथील श्रमादानाची व विकासकामाची पाहाणी करण्यासाठी संपूर्ण गावाचे दर्शन उपसरपंच वासुदेव चापले व ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांचे नेतृत्वात करण्यात आले. मंगी (बु) हे शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले. या अभ्यासदौऱ्यात चंद्रपूरचे गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, टेकामांडवा केंद्राचे केंद्र प्रमुख सुनिल कोहपरे चकनिंबाळाचे सरपंच अनिता पिदुरकर, ग्रामसेवक विजय खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत पिदुरकर, उपाध्यक्ष सुरेखा गोचे, सदस्य प्रतिभा थेरे, सुवर्णा गौरकार, हरिदास वनसिंग, शुभांगी येरगुडे, रविंद्र मडावी, संजय काकडे, भावना गेडाम, मुख्याध्यापक विजय भोगेकर, शिक्षक आशा पिंपळकर, अरुण बावणे, सुरेखा वकर, संतोष शुक्ला, आत्माराम शेंडे, निरक्षा उईके यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मंगी (बु) चे गावातील उपसरपंच वासुदेवजी चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, माजी जि.प.सदस्य भिमराव पुसाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश वेडमे, ज्येष्ठ नागरिक संभाजी लांडे, ग्रा. पं. सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, ग्रा. पं. सदस्य शंकर तोडासे गावतील नागरिक व युवक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.