जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका व पाचोरा शहरात नंबर दोन चे धंदे बंद करण्याची मागणी ग्रामीण पत्रकार संघ करणार उपोषण
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा : – नंबर दोन च्या धंद्यानी पाचोरा शहर व तालुक्यात अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. ज्या प्रमाणे शेतकरी कष्टकरी कर्जापायी आत्महत्या करीत आहेत. त्याच प्रमाणे सट्टा, पत्ता, जुगार, गांजा, मटका या नंबर दोन च्या धंद्यां मुळे सर्व सामान्य परीवार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आता खान्देशात आखाजी नावाचा सण येतोय. पारंपरिक रित्या जुगार खेळण्याचा सण आहे. त्या द्रुष्टीने जुगाराचे क्लब सज्ज झालेले आहेत. आता तर शहरात आधुनिक सट्टा चालू झालाय. त्याला चक्री म्हणतात जिच्या विळख्यात अक्षरशः शाळकरी मुले देखील अडकले आहेत.
तालुक्यासह पाचोरा शहरात गुन्हेगारी नंबर दोन च्या धंदे वाल्यांची मुजोरी वाढतच चालली आहे. सर्वसामान्य नागरिक दहशतीत जगत आहेत. अनेकांचे परीवारासोबत जिवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
या विषयी पाचोरा तहसीलदार यांच्या माध्यमातून एक वर्ष आधी निवेदन सुध्दा देण्यात आलेले आहे. परंतु कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासन मात्र अजगरा सारखे सुस्त आहे.अनेक पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे कोणाच्या आशिर्वादाने ठाण मांडून राहतात त्यांची बदली सुध्दा होत नाही. आणि त्या महाशयांचे नंबर दोन च्या धंदे वाल्यांसोबत जणु सोयरीक संबंध आहेत. आणि म्हणूनच सदर प्रकाराला खत पाणी घातले जात आहे.
या सर्व भयावह प्रकाराच्या विरोधात दिनांक 18/04/2022 रोजी ग्रामीण पत्रकार संघाचे विभागिय सचिव भिमराव खैरे पाचोरा पोलीस स्टेशन समोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
ग्रामीण पत्रकार संघ राज्यभरातुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे विभागिय अध्यक्ष मा. राजुभाई जावरे यांनी घोषित केले आहे.