साकोलीत अवैध अतिक्रमणांवर चालवा "बुलडोजर"  - भाजयुमो अध्यक्ष सपन कापगते यांनी केली पुन्हा मागणी

साकोलीत अवैध अतिक्रमणांवर चालवा “बुलडोजर”  – भाजयुमो अध्यक्ष सपन कापगते यांनी केली पुन्हा मागणी

साकोलीत अवैध अतिक्रमणांवर चालवा "बुलडोजर"  - भाजयुमो अध्यक्ष सपन कापगते यांनी केली पुन्हा मागणी

आशिष चेडगे 
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863

साकोली : साकोली सेंदूरवाफा हद्दीतील सर्व अवैद्यरित्या अतिक्रमण हटविण्याकरीता दि. ०९/०२/२०२२ ला नगरपरीषदेत ५० च्या वर स्वाक्ष-यांसह भाजयुमो साकोली शहराध्यक्ष सपन कापगते यांनी दिले होते. पण आता हाच रास्त मुद्दा उचलीत सपन कापगते यांनी साकोली नगरपरीषदेला कळविले की मागे ०९ फेब्रु.ला ज्याप्रमाणे नागझिरा रोडवरील अतिक्रमण हटविले आता यावर बुलडोजर चालवून शासकीय जागेंवरील अतिक्रमण हटविण्याकरीता ही मागणी केली आहे.
साकोली – सेंदूरवाफा येथील तलावाजवळ, नागझिरा रोडवरील दिवसेंदिवस वाढते अवैध अतिक्रमण बांधकाम तात्काळ बुलडोजर चालवून हटविण्यात यावे कारण येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून ती जागा इतरांना अवैद्यरित्या खरेदीविक्रीचा संतापजनक प्रकार सुरू आहे. मार्गावर नेहमी विद्यार्थ्यांना रहदारीस अडथडा होत आहे, काहींनीतर चक्क रोडटच दूकानांचे अवैध बांधकाम केले असून हा सुरू असलेला गैरप्रकार नगरपरीषदेने त्वरीत बंद करावा. साकोली तलावलगत होत असलेले व नागझिरा रोडवरील शासकीय जागेंवरील अवैध बांधकाम व अतिक्रमण तात्काळ बुलडोजर लावित हटविण्याकरीता पुन्हा भारतीय जनता युवा मोर्चा साकोली शहर अध्यक्ष सपन कापगते यांनी केली आहे. ज्याप्रमाणे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धनाढ्यांचे अवैध बांधकामावर बुलडोजर चालवित बेरोजगारांना ती जागा उपलब्ध करून न्याय दिला तसेच साकोलीत हे भरमसाठ अवैध अतिक्रमणांवर बुलडोजर चालवित सदर जागा स्थानिक युवा बेरोजगारांना लॉटरी पद्धतीने काढीत कॉन्पलैक्स तयार करून रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.  अशी मागणी भाजयुमो साकोली शहर अध्यक्ष सपन कापगते यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here