महागाई विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

महागाई विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

पेट्रोल, डिझेल, गॅस, इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे भाजपा नेते गप्प का ? काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष – मोहन पंचभाई

भंडार्यात महिलांनी पेटवल्या चुली. युवकांनी तिरडीवर जाळली दुचाकी

काँग्रेस कमिटी मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश भाऊ हटवार व शहर अध्यक्ष भंडारा जिल्हा आकाश भाऊ काकडे यांनी वाढत्या महागाईवर केला निषेध

महागाई विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा येथे दिनांक ५ एप्रिल २०२२ रोज मंगळवारी हुतात्मा स्मारक ती जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला. केन्द्र सरकार वाढवत असलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या आदेशाने घोषना देऊन निषेद करण्यात आले. देशात वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, घरघुती गॅस सिलेंडर व खाण्याचे तेल असे अनेक अनिगरजु जिवनावश्यक वस्तुचे भाव आस्मानाला टेकले असुन आज महाराष्ट्र कमेटीचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार तसेच भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व काँग्रेस सेलच्या वतीने ५ एप्रिल रोज मंगळवार ला महागाई वाढीचा निषेध मोर्चा काढण्यात आला.
बेरोजगार तरुणांना रोजगाराचे प्रलोभन दाखवून गरिबांना १५ लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन देऊन आणि महागाई कमी करण्याचा बढाया हाकून सत्तेवर आलेल्या केंन्द्र सरकारने रोजगार तर दिलाच नाही. याउलट महागाई उच्चांकावर नेत सर्वसामान्यांचे जगणे हा मुस्किल केले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात जिल्हा काँग्रेसने महागाई मुक्त भारतासाठी निषेध आंदोलन करीत केन्द्र सरकारचा निषेध केला. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारक ते त्रिमुर्ती चौकापर्यंत निषेध मोर्चा काढला या मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, माझी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, हे म्हणाले की, काँग्रेस ने काय केले असे म्हणणाऱ्या केंद्र सरकारने काँग्रेसने उभारलेल्या संस्था विकत आहेत. काँग्रेसने काय केले असे म्हणताना भाजपने जनाची नाही तर मनाची लाज पन ठेवली नाही. अशा घनाघाती प्रहार करून टिका केली.

यावेळी प्रदेश अध्यक्ष शिशिर वंजारी, झिया पटेल महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा जयश्री बोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पवन वंजारी माझी अध्यक्ष प्रेमसागर गणविर जिल्हा सचीव धनंजय तिरपुडे मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश भाऊ हटवार, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, आकाशभाऊ काकडे, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, रमेश पारधी, प्रेमदास वनवे अनिता भुरे, मदन रामटेके, शहाशिव वलथरे, पप्पु गिरीपुंजे, बालु ठवकर, कैलास भगत, नरेन्द्र वाघाये, सुभाष वाडीभस्मे, आवेश पटेल, अनिक जमा सोहेल अहमद, विनीत देशपांडे, राकेश कोडापे, कॉम्रेड अमित खोब्रागडे, राजेंन्द्र दमाहे, पंकज हटवार, – आणि मीडिया वार्ता न्युजचे भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी भवन भाऊ लिल्हारे व संपूर्ण काँग्रेस कमिटी चे सदस्य गण हजारो च्या संख्येत सामिल होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here