साकोलीत मुख्य कार्यालये गायब..आली दारुदुकाने व ढाबा ; शासकीय रुग्णालय न दाखविता नकाश्यात खाजगी दवाखान्यांची खैरात..!
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : नगरपरीषद कार्यालयात लावण्यात आलेला गुगल नकाशा हा दिशाभुल करणारा ठरणार असून यात शहरातील मुख्य कार्यालयेच गायब झाले आहेत असा चूकीचा नकाशा जनतेसाठी लाऊन जनतेची दिशाभुल करीत जनतेला खाजगी व्यवसायिकांची व शासकीय रूग्णालयच गायब करून खाजगी हॉस्पिटलांची माहिती देत नगरपरीषद काय सिद्ध करू पाहत आहेत. यावर स्वत: जिल्हाधिकारी भंडारा यांची स्वाक्षरी असून कसा हा प्रभागातील चुकीचा माहिती नकाशा लावला गेला असा दक्ष नागरीकांनी प्रश्ण उचलला आहे.
सदर नकाशात ब्रिटीशकाळीन राजवटातील तहसिल कार्यालय, पंचायत समिति, डाकघर, तालुका कृषि कार्यालय, उपविभागीय कृषि कार्यालय, उपविभागीय पोलीस कारवाई, वन विभाग, दूरभाष केंद्र, बस स्थानक व आगार, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कार्यालय, तालुका भुमि अभिलेख, जूने लहरीबाबा मठ देवस्थान, जिल्हा परीषद हायस्कुल, जि.प. केंद्रिय उच्च प्राथ शाळा ( १८५६ स्थापना) व इतर सर्वात मुख्य म्हणजे शासकीय उपजिल्हा रूग्णालयच गायब करून मात्र खाजगी सर्व हॉस्पिटलांची खैरात वाटून वाईन शॉप दारू दूकाने, मोबाईल शॉपी, मुन्ना, ऑटो मोबाईल, गाडेगोणे अदृष्य दवाखाना, ढाबे, दर्शविली गेली असा अशिक्षितमय नकाशा येथे लावल्याने काही मुळ निवासींनी यावर आक्षेप उचलित नगरपरीषदेने काही माहिती न घेता हा गुगल नकाशा प्रशासकीय प्रसिध्दी करीता चालतो तरी काय.? असा प्रश्ण केल्याने व हा चुकीचा माहिती नकाशा लावल्याने येथील सर्व शासकीय कार्यालयेच यातून चोरीला गेले असा हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे.