ज्ञान विकास नाईट हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई – सायन (पुर्व) मधील काला किल्ला जवळील जोगळेकर वाडी म्युनिसिपल शाळेत स्थित सुप्रसिध्द “ज्ञान विकास नाईट हायस्कूल” येथे
2021-2022 वर्षातील दहावी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा ‘निरोप समारंभ’ संपन्न झाला.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील प्रिन्सीपल परदेशी सर यांच्या अधिपत्याखाली होत असताना प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांसाठी मदत करणा-या अनुराधा मॅडम, समाजसेविका शबनम शेख, मासूम संस्थेचे प्रतिनिधी रुपेश बेटकर, सुरवसे सर, यांच्या सह मराठी भाषा तज्ञ शिक्षिका कामिनी केंद्रे मॅडम, सुलभ रित्या इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक सतिश नागमुडे, गणित तज्ञ शिक्षक डि. बी. आरोटे सर, विज्ञान विषयतज्ञ वर्ग शिक्षक फडतरे सर, समाजसेवक विलास (डॉन) कांबळे, सामाजिक चळवळीतील युवा नेते प्रफुल्ल कांबळे यांची विशेष उपस्थिती होती, तर ह्या समारंभाचे नियोजित व्यवस्थापन आणि समालोचन आयु. जितेंद्र स. कांबळे गुरुजी (दहावीचे विद्यार्थी) यांनी केले.
प्रत्येक शिक्षकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एक भावनिक समन्वय सर्वांच्या आनंदाश्रूतून दिसत होते. योग्य वेळी योग्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर एक आदर्श विद्यार्थी आदर्श समाज आणि घडविण्यासाठी तयार होत असतो.
शेवटी प्रत्येक शिक्षकांना आणि मान्यवरांसह प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू, फुलगुच्छे देऊन करण्यात आले. आणि महत्वाचे ठरले ते शालेय शिक्षण संपल्यानंतर वास्तविक जीवनात आपल्या हक्कांची जाणिव करुन देणारे “भारतीय संविधान” शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या सामाजिक कार्यकर्त्या शबनम शेख यांनी प्रत्येक शिक्षकांना आणि मान्यवरांसह विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या शेवटी वाटप करून निरोप घेतला.
त्याचं बरोबर परीक्षा सुरू असताना मातृशोक झालेला स्मशानातून आईचे अंत्यसंस्कार करून परीक्षेला जाणा-या दिलीप कांबळे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेसाठी प्रिंटर आणि आठवीच्या जान्हवी (अरुणा) जितेंद्र कांबळे यांनी आईच्या स्मरणार्थ संगणक शाळेसाठी देणगी दिली. तसेच, समारंभाच्या वेळी उपस्थित सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था दिनेश जाधव यांनी केली.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देणारे वेळ प्रसंगी मासिक शाळेय फी पासून शाळेय साहित्यासह बोर्ड फी पर्यंत स्वतः च्या पगारातून देणारे, रात्रशाळा हि उनाट विद्यार्थ्यांसाठी आणि नक्कल करून पास केले जाते हा दृष्टिकोन बदलवणारे कॉपी पेक्षा स्व अध्ययनातून विद्यार्थ्यांना सक्षम करणारे, मातृशोक असतानाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या धाडसाने स्मशानभूमीतून विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर नेणारे आदर्श शिक्षक गण आणि त्याच शिक्षकांच्या त्यागाचा आदरभाव राखणारा, प्रौढत्वात शालेय शिक्षण घेत असताना नोकरी-धंदा करणारे विद्यार्थी गण, घरकुटुंबाचा गाडा संभाळत गृहिणी विद्यार्थीनी शेवटच्या दहावीच्या परीक्षा नक्कल (कॉपी) न करता शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमातून स्व अध्ययनातून परीक्षा पार करणारे विद्यार्थी फक्त “ज्ञान विकास नाईट हायस्कूल” मध्ये बघायला मिळाले. अशा आदर्श शिक्षकांची आणि रात्रशाळांची आज समाजाला गरज आहे.
“आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी,
आदर्श समाज, आदर्श देश”