भारताची वाटचाल – निष्क्रिय भविष्याकडे

लेख : –

चिंतनीय लेख आहे, अजिबात राजकीय नाही, प्रत्येकाने आवर्जून वाचा

भारताची वाटचाल – निष्क्रिय भविष्याकडे

भारताची वाटचाल - निष्क्रिय भविष्याकडे

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

यज्ञ आपण कुठे चाललो आहोत

नुसतं राजकारण हे जीवन नाही आहे

बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे

उठा* !! *जागे व्हा

आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देऊन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण 100 यूनिट्स मोफत वीज, फुकट रेशन, सरसकट आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या(पूर्वीच्या ही) सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत

देशात सध्या जवळपास 67% लोकसंख्या तरुणांची आहे, हेच प्रमाण महाराष्ट्रातही आहे ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना 600 रुपये दिले की जेवण मोफत, वीज सरसकट, कर्जमाफी अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे

यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या 10 वर्षापासून इ. 1ली ते 8वी पर्यंत परिक्षाच नाहीये किंवा बौद्धिक क्षमता नसतानादेखील विद्यार्थ्यांना पास करायचं.(9 वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत) त्यामुळे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे

ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागड़े mobile, bike तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फ़ोटो कोणत्या पोज़मध्ये टाकायचा याच चर्चेत असते. आणि हे सुद्धा कोणतीही शैक्षणिक पात्रता नसतांना व बौद्धिक कुवत नसतांना

आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला उपलब्ध होते फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता फुकट रेशन याने एक आख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे

आजच्या तरुणाकडे आशिष्ठः द्रढिष्ठाः बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल

सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा राहणार कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे 5-6 टक्के जे करदाते आहेत ते व शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते

स्विझरलैंड मध्ये 3-4 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती

तेव्हा 97% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नको, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला

आपल्याला स्विझरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो

आपल्याला जर खरच स्वतःला आणि देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेल. सरकारने ही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात

अन्न खाण्यासाठी पैसे नाहीत, किमान आपण राहत असलेल्या घराचे 100 units चे बिल भरण्याचे पैसे नाहीत अशी अवस्था अपवाद सोडता कुठेही नाही मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो व यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे रिकामे मन, सैतानाचे घर’ यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार , दलाली, कमी कष्टात कसे पैसे मिळवता येतील d तोडी-पाणीचे कमिशनगीरी चे उद्योग वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते

आज तरुण पिढी राजकारण, नशा,सहज मिळणारा पैसा, श्रमदाना पासून अलिप्त यामुळे होत असलेले दुष्परिणाम म्हणजेच तरुण पिढी ना आई-वडिलांचा आदर ठेवतात, ना वडीलधारी मंडलीचा, ना शिक्षकांचा यावर कुठेतरी सकारात्मक विचार व्हायलाच हवा.