महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचा १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम….
✍️सचिन मापुस्कर ✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞86985 36457📞
दिघी :-आज दिनांक ५/४/२०२५ रोजी प्रा.आ.केंद्र म्हसळा अंतर्गत *NCD medicine kit* वाटपाचा कार्यक्रम पंचायत समिती म्हसळा येथे आयोजीत करण्यात आला . कार्यक्रमा मध्ये *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मा.श्री . समीर जी बनकर साहेब* यांनी रूग्णांना NCD विषयी सखोल मार्गदर्शन केले . म्हसळा नगर पंचायत च्या नगरसेविका मा.श्रीम. सरोज म्हशीलकर मॅडम यांनी देखील रुग्णांना मार्गदर्शन केले . तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ . श्री . श्रीकांत बिराजदार सर यांनी कॅन्सर , हदयरोग, व ब्लड प्रेशर या आजारां विषयी रुग्णांना मार्गदर्शन करून नियमित औषधे घेणे विषयी आरोग्य शिक्षण दिले . व रुग्णांना ३ माहिन्याचे NCD मेडीसीन देण्यात आले . कार्यक्रमा प्रसंगी मा . श्री . समीर जी बनकर साहेब, मा . श्रीम. सरोज म्हशीलकर मॅडम डॉ . श्रीकांत बिराजदार सर डॉ . श्रीम. श्रद्धा पाटील मॅडम, डॉ . श्री . प्रफुल्ल ऐकाडे सर म्हसळा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी श्री . पी . एस . पाटील प्रा – आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री . म्हात्रे व सर्व आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री . पी . एस . पाटील यांनी केले . व . अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले .