कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016

चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे व प्रमुख मार्गदर्शक मा. श्री.दीपक व्यास (व्यवस्थापक) बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन,चंद्रपूर यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापिका शमीना अली उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शकांनी बी.एड्. अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांना व्यक्तिमत्व विकासामध्ये बद्दल घडविण्यासाठी ध्येय ,संयम ,आत्मविश्वास,संवाद कौशल्य ,लक्ष निर्धारण,वेळ व्यवस्थापन, अनुकूलन, संघर्ष याद्वारे व्यक्ती परिवर्तन घडवून आणू शकतो तसेच जीवनात होणाऱ्या चुकांमधूनच व्यक्ती शिकत असतो आणि विविध प्रकारच्या संधी प्राप्त करू शकतो व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा घडविला जातो असे उदाहरणासहित समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे तसेच यशस्वी होण्यासाठी इतरांची तुलना करू नये त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन असणे गरजेचे आहे याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शमींना अली यांनी केले. सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्ष छात्राध्यापिका प्रियंका चिवंडे व आभार प्रदर्शन छात्राध्यापिका कुमारी वैभवी मळावी यांनी केले तसेच बी.एड. प्रथम वर्ष छात्राध्यापिका आकांक्षा मडावी यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेबद्दल आपला अभिप्राय दिला. प्राध्यापिका सुचिता खोब्रागडे , प्राध्यापिका अश्विनी सातपुडके,प्राध्यापिका वनिता हलकरे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका जयमाला घाटे,प्राध्यापक राजकुमार भगत, ग्रंथपाल श्री. चंदन जगताप शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्री. मोरेश्वर गाऊञे, विजय बाळबूधे तसेच बी.एड.प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.