लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्या : युवा सेनेची मागणी
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कोनसरी आणि सुरजागड येथील कंपनीमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना व शिवसैनिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तत्कालीन काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अतिदुर्ग नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील युवकांना स्थानिकांना रोजगार मिळण्याकरिता जिल्ह्यात लोह प्रकल्प सुरू केला परंतु जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना डावलून बाहेर जिल्ह्यातील युवकांना विविध पदावर नोकरीवर व शिलेबाजीने लावले जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर व शिवसैनिकांवर होणारा अन्याय दूर करावा यासाठी जिल्ह्याचे सह पालकमंत्री तथा वित्त व नियोजन कृषी, विधी व न्याय कामगार कल्याण मंत्री मा.आशिष जयस्वाल यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना युवा सेना उप जिल्हाप्रमुख सागर भांडेकर, तालुकाप्रमुख रक्षित पोटवार, शहर प्रमुख कल्पक मुपीडवार उपस्थित होते.